Latest

HBD Jaya Bachchan : जया बच्चन झाल्या ७६ वर्षांच्या; अमिताभ म्हणाले…माझी अर्धांगिनी

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बच्चन परिवारासाठी आजचा दिवस खूप खास आहे. कारण आज ९ एप्रिल रोजी जया बच्चन आपला ७६ वा वाढदिवस साजरा करत आहे. जया बच्चन यांच्या परिवाराने खास अंदाजात त्यांच्या वाढदिवस साजरा केला तर. (HBD Jaya Bachchan) अमिताभ बच्चन यांनी आपल्या लेडी लव्हसाठी एक स्पेशल पोस्ट शेअर केली. बिग बींनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलं-माझी अर्धांगिनी आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. तिच्यासाठी आलेल्या सर्व शुभेच्छांसाठी मनापासून शुभेच्छा. (HBD Jaya Bachchan)

अमिताभ यांनी हेदेखील सांगितलं की, पत्नीचा वाढदिवस त्यांनी कशाप्रकारे साजरा केला. त्यांनी सांगितलं की, त्यांचे संपूर्ण कुटुंबीय कशाप्रकारे अर्ध्या रात्री एकत्र झाले आणि त्यांना विश केलं. बिग बींनी लिहिलं-मिड नाईटमध्ये ९ एप्रिलसाठी एक फॅमिली गेट टुगेदर झाला. कुटुंबीयांनी खूप प्रेम दिलं.

जया आणि अमिताभ यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. दोघांच्या लग्नाला ५० वर्ष पूर्ण झाले आहेत. आज जया यांच्या वाढदिवसानिमित्त सेलिब्रिटींनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत.

जया यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास या वयातही त्या अभिनयात सुपर ॲक्टिव्ह आहेत. जया यांनी शेवटी रॉकी और रानी की प्रेम कहाणी या चित्रपटात काम केलं होतं. चित्रपटात त्यांनी खडूस आजीची भूमिका केली होती. त्यांच्यासोबत धर्मेंद्र होते. विशेषकरून त्यांचा किसिंग सीन खूप चर्चेत राहिला होता.

अमिताभ बच्चन 'कल्कि' चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात प्रभास, कमल हासन, दीपिका पादुकोण यासारख्या तगड्या कलाकारांची भूमिका असेल.

SCROLL FOR NEXT