Latest

आपल्‍या मुलांसाठी सत्ता बळकावणे हेच ‘इंडिआ आघाडी’च्‍या नेत्‍यांचे लक्ष्‍य : अमित शहांचा हल्‍लाबोल

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भाजप विरोधी इंडिया आघाडीचे उद्दिष्ट काय आहे?, असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष्य आत्मनिर्भर भारताचे आहे. तर सोनिया गांधींचे लक्ष्य राहुल गांधींना पंतप्रधान करणे हे आहे. शरद पवार यांचे उद्दिष्ट त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री बनवणे आहे. ममता बॅनर्जी, उद्दिष्ट आपल्या पुतण्याला मुख्यमंत्री बनवणे आहे. तसेच तामिळनाडूचे मुख्‍यमंत्री स्टॅलिन, राष्‍ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू यादव, उद्धव ठाकरे या तिघांचेही लक्ष्य आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवणे आहे.समाजवादी पार्टीचे मुलायमसिंह यादव यांनी मुलगा मुख्यमंत्री झाल्‍याची खात्री करून घेतली. या नेत्‍यांना आपल्या कुटुंबासाठी सत्ता बळकावायचे आहे, ते कधी गरिबांच्या कल्याणाचा विचार करतील का?, अशा शब्‍दांमध्‍ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी इंडिया आघाडीच्‍या नेत्‍यांवर हल्‍लाबोल केला. आज
( दि. १८) भारतीय जनता पक्षाच्‍या राष्‍ट्रीय अधिवेशनात ( BJP National Convention) ते बोलत होते.

देशानं ठरवलंय मोदी हेच पुन्‍हा देशाचे पंतप्रधान होतील : अमित शहा

या वेळी अमित शहा म्‍हणाले की,  देशाने मागील ७५ वर्षांमध्‍ये १७ लोकसभा निवडणुका, २२ सरकारने आणि १५ पंतप्रधान पाहिले आहेत. देशातील प्रत्‍येक सरकारने आपल्‍या काळानुसार विकास घडवून आणण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. मात्र देशातील प्रत्‍येक क्षेत्राचा आणि प्रत्‍येक व्‍यक्‍तीचा विकास हा पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्‍या मागील १० वर्षांच्‍का कार्यकाळातच झाला आहे, असा दावा करत देशाने ठरवले आहे की, नरेंद्र मोदी हेच पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील, यात शंका नाही, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला. ( BJP National Convention)

PM मोदींनी देशाला गुलामगिरीचे प्रतिकातून मुक्‍त करण्‍याचे आवाहन केले

यावेळी अमित शहा म्‍हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम देशाला गुलामगिरीच्‍या प्रतिकातून मुक्‍त करण्‍याचे आवाहन केले. वास्‍तविक ही प्रक्रियाला जेव्‍हा देशाला स्वातंत्र्य मिळालेल्‍या दुसर्‍या दिवसापासूनच सुरु होणे गरजेचे होते. मात्र काँग्रेस आणि या पक्षाच्‍या मित्र पक्षांनी देशाला गुलामगिरीच्या प्रतिकातून मुक्त करण्याची कल्पनाहीकेली नव्हती, अशी टीकाही त्‍यांनी केली. ( BJP National Convention)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या तिसर्‍या कार्यकाळात समृद्ध भारत हा दहशतवाद, अतिरेकी आणि नक्षलवादापासून मुक्त होऊन शांततेच्या दिशेने वाटचाल करेल, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

SCROLL FOR NEXT