Latest

Cyclone Biparjoy | गुजरातमध्ये गृहमंत्री अमित शहांनी ‘बिपरजॉय’ने प्रभावित भागांची केली पाहणी, रुग्णालयात जाऊन लोकांनाही भेटले

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाइन डेस्क : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी गुजरातच्या कच्छ येथील बिपरजॉय चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या भागांची हवाई पाहणी केली. (Cyclone Biparjoy) त्यांच्यासोबत यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल होते. शहा यांनी मांडवी सिव्हिल हॉस्पिटललाही भेट दिली. तेथे त्यांनी चक्रीवादळाशी संबंधित घटनांमध्ये जखमी होऊन रुग्णालयात उपचार घेणाऱ्या लोकांच्या तब्येतीची विचारपूस केली. (Cyclone Biparjoy)

कच्छ, तसेच सौराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जमीन पावसाच्या पाण्याने भरून गेली आहे. ज्यामुळे घरांमध्ये शिरलेल्या पाण्यावर लोकांचे साहित्य तरंगताना दिसले. एकट्या कच्छमध्ये जवळपास ८० हजार विजेचे खांब कोसळले आहेत तर जवळपास ३३ हजार हेक्टर शेतजमीन बाधित झाली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेले चक्रीवादळ गुरुवारी (दि15) रात्री गुजरातच्या किनाऱ्यावर येऊन धडकले. बिपरजॉय चक्रीवादळामुळे समुद्र खवळून प्रचंड मोठ्या लाटा निर्माण झाल्या. तसेच प्रचंड मुसळधार पाऊस पडला. वेगाने वाहणारे वारे-वादळ यामुळे गुजरातच्या कच्छ, जखाऊ, मांडवी या भागात या चक्रीवादळाने भीषण तांडव केले.

बिपरजॉय चक्रीवादळ पुढील १२ तासांत डीप डिप्रेशनमध्ये कमकुवत होण्याची शक्यता आहे.

शहा यांनी मांडवी जिल्ह्यातील कथडा गावातील नागरिकांचीही भेट घेतली. त्यानंतर ते भुजमधील स्वामी नारायण मंदिराला भेट देणार आहेत आणि बाधित लोकांसाठी पुरविण्यात येत असलेली अन्न सामग्री आणि इतर सुविधांचा आढावा घेणार आहेत. दरम्यान, अमित शहा आज सायंकाळी ५ वाजता भूजमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत.

अमित शहा यांनी मांडवी सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिली आणि तिथे दाखल झालेल्या लोकांच्या तब्येतीची विचारपूस केली.

SCROLL FOR NEXT