Latest

अमेरिकन स्पाय चीफनाही वाटते ‘ते’ परग्रहवासीयांचे यान!

निलेश पोतदार

वॉशिंग्टन : जगभरातून 'यूफो' म्हणजेच 'उडत्या तबकड्यां'बाबतचे दावे होत असतात. मात्र, त्यांचे वास्तव अद्यापही समोर आलेले नाही. आता अमेरिकेच्या एका टॉप स्पाय चीफने दावा केला आहे की अमेरिकेच्या पायलटस्नी पाहिलेल्या किंवा लढाऊ विमानांजवळ पाहिल्या गेलेल्या अज्ञात वस्तू म्हणजे 'यूफो' किंवा परग्रहवासीयांची याने असू शकतात.

अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सचे संचालक एवरिल हॅन्स यांनी याबाबतची माहिती दिली. नॅशनल इंटेलिजन्स अमेरिकेच्या एफबीआय आणि सीआयएसहीत सर्व सोळा हेरगिरी संस्थांची देखरेख करते. एवरिल हॅन्स यांना 'यूफो' बाबत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. आता हा अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विषय बनलेला आहे.

अमेरिकन लष्कराचे मुख्यालय असलेल्या 'पेंटॅगॉन'ने याचवर्षी 'यूफो'वर एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की आकाशातील उडणार्‍या अज्ञात वस्तू आणि अमेरिकेच्या सैन्य दलातील पायलटस् यांचा आमना-सामना झाला आहे. या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की गेल्या सतरा वर्षांमध्ये पृथ्वीवर 144 वेळा यूफो पाहण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांचा एलियन्सशी संबंध जोडला गेलेला नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT