Latest

Ameesha Patel : अमिषा विरोधात रांची कोर्टाने जारी केलं वॉरंट

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री अमीषा पटेल विरोधात रांचीच्या एक सिव्हील कोर्टाने वॉरंट जारी केलं आहे. (Ameesha Patel) अमीषा आणि तिचा बिझनेस पार्टनर क्रुनाल विरोधात फसवणूक आणि चेक बाउन्स प्रकरणी गुरुवारी वारंट जारी केलं आहे. तक्रार दाखल करणारे अजय कुमार सिंह झारखंडचे चित्रपट निर्माते आहेत. त्यांनी अमीषा पटेल आणि तिच्या पार्टनरविरोधात केस दाखल केली होती. (Ameesha Patel)

१५ एप्रिलला होणार पुढील सुनावणी

एका रिपोर्टनुसार, रांचीतील सिव्हिल कोर्टाने आपली नाराजी व्यक्त केलीय. कारण, समन्स पाठवूनही अमीषा पटेल आणि तिचे वकील आपली बाजू मांडण्यासाठी कोर्टात हजर राहिले नाहीत. आता पुढील सुनावणी १५ एप्रिलला होईल.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

रांची जिल्ह्यातील हरमू येतील रहिवासी अजय कुमार सिंहने अमीषा आऐणि तिच्या बिझनेस पार्टनरविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. अमीषाने त्यांना देसी मॅजिक नावाच्या एका चित्रपटासाठी पैसे गुंतवण्यासाठी आमंत्रित केलं होतं. त्यानंतर अजय सिंह यांनी चित्रपट मेकिंग आणि प्रमोशनसाठी अमीषाच्या बँक अकाऊंटमध्ये अडीच कोटी रुपये ट्रान्सफर केले होते. तक्रारदाराच्या माहितीनुसार, चित्रपटाचे शूटिंग २०१३ मध्ये सुरू होणार होते. पण, अदायपपर्यंत हे शूटिंग सुरू जाले नाही. त्यामुळे अजयने आपले पैसे परत मागितले. अमीषा आणि बिझनेस पार्टनरने त्यांना विश्वास दिला होता की, चित्रपट पूर्ण झाल्यानंतर त्यांचे पैसे व्याजासहित परत देतील.

अमीषाने दिलेले चेक बाऊन्स

तक्रारदाराने पुढे म्हटलंय की, अमीषाने त्यांना ऑक्टोबर २०१८ मध्ये २.५ कोटी रुपये आणि ५० लाख रुपयांचे दोन चेक दिले होते, जे बाऊन्स झाले.

SCROLL FOR NEXT