Latest

Ambedkar Jayanti : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त (Ambedkar Jayanti ) दादरच्या चैत्यभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले. त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. (Ambedkar Jayanti )

ठाकरे यांनी ट्विट करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला जनतेला शुभेच्छा दिल्या. त्यांनी ट्विट केले की, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या सशक्त राज्यघटनेच्या पाठबळावरच राज्याची विकासाची वाटचाल सुरु आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय की, बाबासाहेबांच्या मानवकल्याणाचे विचार सर्वदूर पोहोचवून देशातील एकता, समता, बंधूतेचा विचार मजबूत करुया.

ट्विटरवर अनेक राजकीय नेत्यांनीही ट्विट करत महामानवाला अभिवादन केले आहे. जयंतीनिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये म्हटलं आहे, समाजात एकता, समता, बंधुतेची भावना रुजावी; प्रत्येकाला सन्मानाने, स्वाभिमानाने जगण्याचा हक्क मिळावा, यासाठी डॉ.बाबासाहेबांनी लढा दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अभिवादन केले. त्‍यांनी आपल्‍या संदेशात म्‍हटलं आहे की, फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचारच धर्मांध सत्तेविरोधात उभे राहण्याची ताकद आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT