Latest

amarnath yatra 2023 : यंदाची अमरनाथ यात्रा तंबाखूमुक्त

Arun Patil

जम्मू : शनिवारपासून (1 जुलै) सुरू होणारी अमरनाथ यात्रा आता पूर्णपणे तंबाखूमुक्त असेल. जम्मू-काश्मीरच्या आरोग्य विभागाने हा आदेश जारी केला आहे. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत अमरनाथ यात्रा तंबाखू मुक्त करण्यात आली आहे. आदेशानुसार, यात्रा मार्गावरील सर्वच ठिकाणी तंबाखू उत्पादनांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली आहे.

गांदरबल आणि अनंतनाग जिल्हाचे प्रशासन या कामासाठी मदत करेल. अमरनाथ श्राईन बोर्डाच्या नियमानुसार, जोखमीच्या अडीच किलोमीटर रस्त्यावर भाविकांना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. एवढेच नाही तर खेचरावरून जाणार्‍या भाविकांनाही हेल्मेट बंधनकारक करण्यात आले आहे. श्राईन बोर्डाकडून हेल्मेट मोफत वाटली जाणार आहेत.

SCROLL FOR NEXT