Latest

U-Turn: अलाया एफच्या ‘यू-टर्न’चा ट्रेलर रिलीज, यादिवशी ओटीटीवर पाहता येणार

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अलाया एफ सध्या आगामी चित्रपट 'यू-टर्न'मुळ चर्चेत आहे. या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आलीय. तिचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. यू-टर्नमध्ये अलाया शिवाय प्रियांशु पेनयुली देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट कन्नड चित्रपटाचा हिंदी रीमेक आहे, ज्यामध्ये श्रद्धा श्रीनाथने महत्त्वाची भूमिका साकारली होती. (U-Turn) कन्नड चित्रपट २०१६ रोजी रिलीज झाला होता. चित्रपट यू-टर्नची कहाणी एका फ्लायओव्हरवर ट्रॅफिक नियम तोडणाऱ्या बाईकस्वारांच्या मृत्यूच्या अवतीभोवती फिरते. २०१७ मध्ये हा चित्रपट मल्याळम भाषेतही तयार करण्यात आला आहे. (U-Turn)

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="स्टोरीज" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_date" view="circles" /]

हा चित्रपट कन्नड भाषेमध्येही रिलीज करण्यात आला आहे. कन्नड-मल्याळममध्ये रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाला तमिळ आणि तेलुगू भाषेतही रिलीज केला होता. तमिळ व्हर्जनमध्ये सामंथा दिसली होती. हिंदीमध्ये चित्रपटाचे दिग्दर्शन आरिफ खानने केले आहे. शोभा कपूर आणि एकता आर कपूरच्या बालाजी टेलीफिल्म्सने निर्मिती केलीय. अलाया एफसोबत प्रियांशु पेंयुली, राजेश शर्मा, आशिम गुलाटी, श्रीधर दुबे, साहिल ताखी, अपूर्व सुमन यांच्या भूमिका आहेत. प्रीमियर २८ एप्रिल २०२३ रोजी होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT