Latest

Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या नव्या चित्रपटाचे कोट्यवधीचे बजेट; निर्माते पैसे घालायला तयार?

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ अभिनेता अल्लू अर्जुन याच्या 'पुष्पा- द राइज' (Pushpa 2) या चित्रपटाने चाहत्यांच्या खूपच प्रतिसाद मिळाला. या चित्रपटातील अभिनयासोबत गाणीदेखील हिट झाली. यानंतर निर्माते अल्लू अर्जुनचा 'पुष्पा-२' चा सिक्कल लवकरच आणणार आहेत. Pushpa 2 या चित्रपटाचे रिलीज डेट आणि लागणाऱ्या बजेटची माहिती समोर येत आहे.

पुष्पाचा सिक्वेल आणखी दमदार करण्यासाठी निर्मात्यांनी कोणतीही कसर सोडली नाही. या चित्रपटात अभिनेता विजय सेतुपतीची मुख्य भूमिका साकारली आहे. अल्लू अर्जुनसोबत फहद फाजील आणि रश्मिका मंदान्ना या चित्रपटात आहेत. तसेच यासाठी अॅक्शन सीक्वेन्स आणि स्टंट्सची योजना आखली जात आहे. अल्लू अर्जुनच्या या दमदार सीक्वलचे बजेट ३५० कोटी रुपये असणार असल्याचे रिपोर्ट्समध्ये समोर आले होते. परंतु, सध्या या चित्रपटाचे निर्माते वाय. रविशंकर यांनी 'पुष्पा 2' चे बजेट यापेक्षाही अधिक असल्याचे बोलले आहे.

निर्माते वाय. रविशंकर म्हणाले की, साऊथच्या या चित्रपटाला मिळालेल्या यशाने आम्ही नक्कीच आश्चर्यचकित झालो होतो. आगामी 'पुष्पा २' साठी ५०० कोटी रुपये लागतील असा अंदाज आहे. तसेच हा चित्रपट १० भाषांमध्ये रिलीज करण्याच्या विचारात असल्याचे म्हटले आहे. तर 'पुष्पा २' च्या प्रमोशनचे बजेट ५ पटीने वाढू शकते आणि ५० कोटी रुपयांपर्यंत खर्च होऊ शकतो. यावेळी पुष्पा २ देशाच्या प्रत्येक भागात जवळपास दोन महिने जोरदार प्रमोशन करायचे असल्याचा खुलासाही त्यांनी केला आहे.

रिलीज डेट

याच दरम्यान निर्मात्यांनी 'पुष्पा २' ऑगस्ट २०२३ पर्यंत चित्रपट रिलीज होणार असल्याचे सांगितले आहे. याआधी हा चित्रपट डिसेंबर २०२२ पर्यंत रिलीज करण्याची योजना होती. पण आता निर्मात्यांनी पुढची तारीख सांगितली आहे. तर मोठ्या बजेटसाठी कोटी रूपये खर्च करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT