Latest

US Flights : अमेरिकेतील विमानसेवा ठप्‍प : संगणक प्रणालीत मोठा बिघाड

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अमेरिकेतील विमानसेवा आज ( दि. ११)  सकाळपासून ठप्‍प झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुमारे ४०० उड्डाणे एकतर उशिराने धावत आहेत किंवा काही काळासाठी सेवा ठप्‍प करण्‍यात आली आहे. अमेरिकेतील नागरी विमान सेवेच्‍या वेबसाईटने याला दुजोरा दिला आहे. ( flights across the us have been grounded)

अमेरितेील फेडरल एव्हिएशन एजन्सीने  म्हटले आहे की, संगणक प्रणालीत बिघाड झाला आहे. त्‍यामुळे ही समस्‍या निर्माण झाली आहे. ही सेवा केव्‍हा सुरळीत करण्‍यासाठी आमचे  प्रयत्न सुरू आहेत.

एनबीसी न्यूजने म्‍हटले आहे की, सुमारे ४०० विमानांची उड्डाणे उशीर होत आहेत. यामध्‍ये देशांतर्गत आणि परदेशातील विमानांचा समावेश आहे. अमेरिकन वेळेनुसार पहाटे ५.३१ च्या सुमारास हा तांत्रिक बिघाड उघडकीस आला. मात्र, यामागचे कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ( flights across the us have been grounded)

SCROLL FOR NEXT