Latest

समुद्रतळाशी लपून राहतात एलियन? ‘नासा’च्या माजी संशोधकाचा दावा

दिनेश चोरगे

वॉशिंग्टन : एलियन्स म्हणजेच परग्रहवासीयांचे अस्तित्व आहे की नाही हे अद्याप विज्ञानाने ठामपणे सांगितलेले नाही. मात्र अंतराळाच्या या अनादी अनंत पसार्‍यात केवळ पृथ्वी नामक ग्रहावरच जीवसृष्टी असेल असे मानणे हे 'कूपमंडुक' वृत्तीसारखेच आहे. विहिरीतील बेडकाला विहीर म्हणजेच सर्व जग आहे असे वाटत असते, तसाच हा प्रकार होईल. एलियन्सबाबत अनेक दावे केले जात असतात. जगभरातून अनेकांनी 'युफो' म्हणजेच उडत्या तबकड्या पाहिल्याचे दावे केलेले आहेत. मेक्सिकोच्या संसदेत तर एलियन्सचे कथित मृतदेहही दाखवले गेले होते. आता अमेरिकेतील 'नासा'च्या एका माजी संशोधकाने दावा केला आहे की 'युफो'चे पायलट असलेले एलियन्स जमिनीवर राहण्याऐवजी महासागरांच्या पाण्याखाली राहून मानवावर नजर ठेवत असावेत, असे म्हणण्यास वाव आहे.

2001 ते 2005 या काळात 'नासा'च्या 'एमीस रिसर्च सेंटर'मध्ये काम केलेल्या या संशोधकाचे नाव ओ केविन नुथ. एलियन पाण्याखाली राहून माणसावर पाळत ठेवत असतील, असे मानण्याची अनेक कारणे आहेत. ते म्हणाले की, जर एलियनना लपूनच राहायचे असेल तर समुद्रतळ हा त्यासाठी चांगला पर्याय आहे. ते तिथे बेस बनवून राहत असतील. केविन यांनी 'थेअरिज ऑफ एव्हरीथिंग' पॉडकास्टला सांगितले की पृथ्वीचा 75 टक्के भाग पाण्यात आहे आणि त्या पाण्यापर्यंत आपली पोहोच अतिशय कमी आहे. त्यामुळे एलियन्ससाठी ही जागा सर्वात सुरक्षित आणि सोयीची आहे. एक युफो तर हवा आणि समुद्रातही सहजपणे चालू शकणारे होते. दोन ग्रहांवरील तापमानातही फार फरक असतो. त्यामुळे जमिनीवर राहण्याऐवजी परग्रहवासीयांना पाण्याखाली राहणे अधिक सुरक्षित ठरू शकते. जर असे एलियन्स पाणी असलेल्या ग्रहांवरूनच आले असतील तर त्यांच्यासाठी हे अधिक चांगले आहे.

SCROLL FOR NEXT