Latest

Alia Bhatt Time 100 List : जगातील १०० दिग्गजांमध्ये आलिया भट्टचा समावेश

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडमधील यशस्वी अभिनेत्री आलिया भट्टचे नाव टाईम्स मॅगझीनच्या जगातील टॉप १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समाविष्ट झाले आहे. २०२४ मध्ये प्रभावशाली लोकांची यादी जारी करण्यात आली आहे. (Alia Bhatt Time 100 List ) या यादीत अभिनेत्री आलिया भट्टचे नाव समाविष्ट झाले आहे. तिने आपल्या अभिनयामुळे परदेशातदेखील ओळख निर्माण केलीय. (Alia Bhatt Time 100 List )

टाईम्स मॅगझीनच्या यादीत आलिया भट्टला अद्भुत टॅलेंट म्हटले गेले आहे. याशिवाय, इंडियन-ब्रिटिश अभिनेते देव पटेल आणि प्रसिद्ध गायिका दुआ लीपाचे नाव देखील या यादीत समाविष्ट आहे.

TIME 100 लिस्टमध्ये आलियाचे नाव

या यादीची घोषणा करत आलिया भट्टच्या प्रोफाईलमध्ये लिहिलं आहे की, ती जगाच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्री आलियाने 'टॉम हार्पर' सोबत तिचा पहिला हॉलीवूड चित्रपट 'हार्ट ऑफ स्टोन'मध्ये काम केलं आहे.

या दिग्गजांची नावेदेखील समाविष्ट

या यादीत ऑस्कर विजेता डा वाईन जॉय रँडोल्फ आणि ऑस्कर नामांकित अभिनेते जेफरी राईट तसेच कोलमॅन डोमिंगो यांचेही नाव समाविष्ट आहे. याशिवाय ताराजी पी हेंसन, इलियट पेज, मायकल जे. फॉक्स, सोफिया कोपोला आणि हयाओ मियाजाकनेदेखील लिस्टमध्ये आपले स्थान मिळवले. इतकचं नाही तर मूळचे भारतीय वंशाचे अभिनेते देव पटेल यांचे नाव देखील या लिस्टमध्ये समाविष्ट आहे.

आलिया सध्या 'जिगरा' च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. याशिवाय ती संजय लीला भन्साळींचा चित्रपट लव्ह अँड वॉरमध्येही दिसणार आहे.

SCROLL FOR NEXT