Latest

राहुरीत शैक्षणिक पेशाला काळिमा फासणारी घटना ! मद्यपी शिक्षकाचं पाचवी- सहावीच्या विद्यार्थिनीनींसोबत गैरवर्तन

अमृता चौगुले

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील निंभेरे परिसरात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. जिल्हा परिषद शाळेतील एका मद्यपी शिक्षकाने सहावी व सातवी च्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलींच्या अंगाला नको तिथे स्पर्श करून निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे. पोलिसांनी शिक्षकाला ताब्यात घेऊन गजाआड केले. राहुरी तालुक्यातील निंभेरे परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत आरोपी मदन दिवे या विकृत व मद्यपी शिक्षकाने सहावी व सातवी च्या वर्गात शिकणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींच्या अंगाला स्पर्श करून विनयभंग केला.

या घटनेबाबत सदर मुलींनी त्यांच्या घरातील लोकांना शिक्षक करत असलेल्या विकृत चाळ्यांची माहिती दिली. मुलींच्या नातेवाईकांनी राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी ताबडतोब त्या शिक्षकाला ताब्यात घेऊन गजाआड केले. राहुरी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीवरून आरोपी मदन रंगनाथ दिवे, (राहणार दाढ बुद्रुक, तालुका राहता) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक घनश्याम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक निरज बोकील हे करीत आहे.

SCROLL FOR NEXT