Latest

अक्षयचा पुढील दिवाळीत रीलिज होणार ‘हाऊसफुल – ५’

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : सुपरस्टार अक्षय कुमारने कॉमेडीपट 'हाऊसफुल-4'ची रीतसर घोषणा केली. आश्चर्य म्हणजे या चित्रपटाचे पहिले ४ भाग येऊन गेले आहेत. 'दोस्ताना' आणि 'ड्राईव्ह' यासारख्या चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या तरुण मनसुखानी 'हाऊसफुल- ५' चे निर्देशन करणार आहेत. हा चित्रपट पुढील दिवाळीत प्रदर्शित होईल, असे अक्षयकुमारने याप्रसंगी सांगितले. या चित्रपटात अक्षयसह रितेश देशमुखचीही भूमिका असणार आहे.

साजिद नाडियावाला या चित्रपटाचे निमति असतील, तर नाडियावाला ग्रैंडसन एंटरटेन्मेंटच्या बॅनरवर हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. यापूर्वी २०१० मध्ये 'हाऊसफुल' चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर २०१२ मध्ये 'हाऊसफुल २, २०१६ मध्ये 'हाऊसफुल ३' व २०१९ मध्ये 'हाऊसफुल-४' प्रदर्शित केले गेले. आता पुढील दिवाळीत या चित्रपटाचा पाचवा भाग येईल, हे जवळपास निश्चित झाले आहे.

SCROLL FOR NEXT