Latest

अकोला सत्र न्यायालयाकडून बच्चू कडूंना अटकपूर्व जामीन मंजूर

अविनाश सुतार

अकोला; पुढारी वृत्तसेवा : राज्यमंत्री तथा अकोलाचे पालकमंत्री बच्चू कडू यांना अकोला न्यायालयाने अटकपूर्व जामीन आज (दि.११) मंजूर केला . अकोला येथील रस्त्याच्या कामात २ कोटीचा गैरव्यवहार प्रकरणी वंचित बहुजन आघाडीने तक्रार दिली होती. यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांना जामीन मिळाल्याने दिलासा मिळाला आहे.

याबाबत सविस्तर असे की, अकोला जिल्हा परिषदेने नियोजन समितीकडे पाठवलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावात परस्पर बदल करून अस्तित्वात नसलेल्या रस्त्यावर नियोजन समिती अध्यक्ष या नात्याने पालकमंत्री बच्चू कडू यांनी १ कोटी ९५ लाखांच्या निधीचा अपहार केल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीने पोलिसांत दिली होती. मात्र, पोलिसांनी कारवाई केली नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करून अहवाल सादर करावा, असा आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले होते.

जिल्हा नियोजन समितीने वार्षिक आराखडा तयार करताना जि. प. कडून ग्रामीण रस्ते दुरुस्ती, नवी कामे, पुलासाठी प्रस्ताव मागितले होते. त्यानुसार १० मार्च २०२१ रोजी झालेल्या जि. प. च्या सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन प्रस्ताव समितीकडे पाठवण्यात आला. मात्र, शासनाच्या लेखी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यावर समितीचे अध्यक्ष या नात्याने कडू यांनी यंत्रणांचा गैरवापर करून निधी वळवला, असा आरोप होता. शासनाच्या १कोटी ९५ लाखांचा निधीचा अपहार करण्याच्या उद्देशाने बोगस कागदपत्रे तयार केली, असा आरोप 'वंचित'ने केला होता. याप्रकरणी पोलिसांनी दखल घेतली नाही. त्यामुळे 'वंचित'तर्फे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी बच्चू कडूंविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहिता १५६ (३) अंतर्गत प्रकरण न्यायालयात दाखल केले होते.

दुसऱ्यांदा अटकपूर्व जामीन मंजूर

पालकमंत्री बच्चू कडू यांनी २८ एप्रिलरोजी जामीन मिळावा, यासाठी अर्ज केला होता. त्यानंतर त्यांना ९ मेपर्यंत जामीन मंजूर देखील झाला होता. यानंतर त्यांनी पुन्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी अर्ज केला होता. यावर आज सुनावणी झाली. न्यायालयाने मंत्री कडू यांचा जामीन अर्ज मंजूर केल्याने त्यांना या प्रकरणात दोनदा जामीन मंजूर झाला आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT