पुणे : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. राज्य सरकारमध्ये आत्तापर्यंत चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्री पदाची धुरा संभाळत होते.
मात्र चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी करून अजित पवार यांच्याकडे ही जबाबदारी दिली आहे. पुणे हा अजित पवारांचा पूर्वीपासूनच बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे अजित पवार हेच पुण्याचे कारभारी असल्याचं सिद्ध झालं आहे. तसेच पुण्याचे विद्यमान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोलापूर आणि अमरावती या दोन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.
पुणे- अजित पवार
अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील
अमरावती- चंद्रकांत दादा पाटील
भंडारा- विजयकुमार गावित
बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर- हसन मुश्रीफ
गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
बीड- धनंजय मुंडे
परभणी- संजय बनसोडे
नंदूरबार- अनिल भा. पाटील
वर्धा – सुधीर मुनगंटीवार
हेही वाचा