Latest

‘गो फर्स्ट’ च्या दिवाळखोरीमुळे हवाई प्रवास महागणार?

नंदू लटके

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : खासगी क्षेत्रातील हवाई वाहतूक कंपनी 'गो फर्स्ट' ( Go First Airline) ही दिवाळखोरीच्या मार्गावर गेल्यामुळे आगामी काळात काही मार्गांवरील हवाई प्रवास महाग होण्याची शक्यता ट्रॅव्हल एजंटांची संघटना टीएएआयने व्यक्त आहे.

वाडिया उद्योग समूहाच्या ताब्यातील गो फर्स्ट कंपनीने स्वतःहून इन्सॉल्वंसी अँड बॅंकरप्सी कोड अंतर्गत [आयबीसी] दिवाळखोरीचा अर्ज दाखल केला आहे. हा अर्ज दाखल करतानाच तीन दिवसांसाठी पूर्ण हवाई सेवा बंद ठेवण्याचा निर्णय गो एअरने घेतला होता. विदेशातून विमानाचे इंजिन व त्याचे सुटे भाग मिळत नसल्याने गो एअरची अर्ध्याहून अधिक विमाने जागेवरच थांबलेली आहेत. दुसरीकडे आर्थिक अडचणीत सापडल्यानंतर कंपनीने दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल केला आहे.

हवाई वाहतूक उद्योग विविध कारणांमुळे वारंवार संकटात सापडत आहे. किंगफिशर आणि जेट एअरवेजपाठोपाठ आणखी एक कंपनी दिवाळखोरीच्या मार्गाने चाललेली आहे आणि निशि्तचपणे हे दुर्दैवी म्हणावे लागेल, असे ट्रॅव्हल एजंटस असोसिएशनच्या अध्यक्षा ज्योती मायल यांनी सांगितले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT