Latest

Aircraft Skidded : मुंबई विमानतळावर खासगी विमानाला अपघात

backup backup

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबई विमानतळावर एका खाजगी जेट विमानाला गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. कमी दृश्यमानता आणि पावसामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर मुंबई विमानतळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास ही डोमेस्टिक एअरपोर्ट, गेट नंबर पाचवर ही अपघाती घटना घडली. दिलीप बिल्डकॉन या इन्फ्रा कंपनीच्या मालकीचे असलेले व्हीएसआर व्हेंचर्स लिअरजेट हे विमान विशाखपट्टणमहून मुंबईत आले होते.

विमान धावपट्टी क्रमांक २७ वर उतरत असताना घसरले आणि क्रॅश झाले. अपघातात या विमानाचे दोन तुकडे होऊन त्याला आग लागली. या विमानात सहा प्रवासी आणि दोन क्रू मेंबर होते. त्यातील तीन प्रवासी अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. विमानतळावरील सुरक्षा यंत्रणेने विमानाला लागलेली आग विझवत जखमी प्रवाशांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

SCROLL FOR NEXT