Latest

Air Marshal Makarand Ranade : एअर मार्शल मकरंद रानडे निरीक्षण आणि सुरक्षा विभागाचे नवे महासंचालक

रणजित गायकवाड

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भारतीय हवाई दलाचे एअर मार्शल मकरंद रानडे यांनी दिल्ली येथील हवाई दल मुख्यालयात निरीक्षण आणि सुरक्षा विभागाचे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला. एअर मार्शल संजीव कपूर यांचा हवाई दल सेवाकार्याचा कालावधी ३० नोव्हेंबरला पूर्ण झाल्यानंतर एअर मार्शल मकरंद रानडे यांनी त्यांच्याकडून महासंचालकपदाचा पदभार स्वीकारला.

मकरंद रानडे यांनी १९८६ मध्ये भारतीय हवाई दलात लढाऊ विभागातून शासकीय सेवेला सुरुवात केली. ३६ वर्षांहून अधिक कालावधीच्या कारकिर्दीत विविध महत्त्वाच्या पदांवर यशस्वीरित्या काम केले आहे.

रानडे यांनी लढाऊ विमानांच्या तुकडीचे आणि दोन हवाई स्थानकांचे कमांडर म्हणून उत्कृष्ट काम केले आहे. रणनीती आणि हवाई लढा प्रशिक्षण विकास संस्था तसेच संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालय या संस्थांमध्ये संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. काबुल आणि अफगाणिस्तानच्या भारतीय दूतावासांमध्ये त्यांनी सेवा दिली आहे.

हवाई दलाच्या मुख्यालयातही त्यांनी संचालक, कार्मिक अधिकारी, हवाई दल कर्मचारी निरीक्षण संचालनालयाचे मुख्य संचालक आणि हवाई दल कार्यकारी (अवकाश) विभागाचे सहाय्यक प्रमुख या पदांवर काम केले आहे. दरम्यान, त्यांच्या नियुक्तीपूर्वी ते नवी दिल्ली येथील पश्चिम एअर कमांडच्या मुख्यालयात वरिष्ठ अधिकारी पदावर कार्यरत होते. एअर मार्शल रानडे यांना २००६ मध्ये वायु सेना (शौर्य) पदक आणि वर्ष २०२० मध्ये अतिविशिष्ट सेवा पदक देऊन गौरवण्यात आले होते.

SCROLL FOR NEXT