Latest

नगर: अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त

अमृता चौगुले

अकोले: अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी १ उपविभागीय अधिकारी, १ पोलिस निरिक्षक, ३ सहाय्यक पोलिस निरीक्षक, ५ उपनिरीक्षक, ११० पोलिस कर्मचारी असा १५० जणांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती प्रभारी पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांनी दिली.

अगस्ती सहकारी साखर कारखान्याची रविवार, २५ सप्टेंबर रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी बाहेरून अधिकचे पोलिस बळ मागविण्यात आले आहे. त्यानुसार अकोले पोलिस स्टेशनला पोलिस बंदोबस्त उपलब्ध झाला आहे. यामध्ये १ उपविभागीय पोलिस अधिकारी, १ पोलिस निरिक्षक, ३ सहाय्यक पोलिस निरीक्षक, ५ पोलिस उपनिरीक्षक, ११० पोलिस कर्मचारी, दंगल नियंत्रण पथक आणि १० होमगार्ड यांचा समावेश आहे .तरी सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी, सभासद यांनी शांततेत मतदान करावे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होईल असे कोणतेही कृत्य करु नये, असे आवाहन प्रभारी पोलिस निरिक्षक मिथुन घुगे यांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT