पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत जोडो यात्रादरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभरात भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनेकडून निदर्शने, आंदोलन करण्यात आली आहेत. राज्यभरात विविध ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांकडून राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.
पुण्यात आज भाजप युवा मोर्चाने काँग्रेस भवनामध्ये मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. तर काही कार्यकर्ते काँग्रेस भवनामध्ये घुसून राहुल गांधीं यांच्या पोस्टरला काळं फासून फाडले. पोलिसांनी या आक्रमक झालेल्या भाजपच्या युवा कार्यकर्त्यांना लगेचच ताब्यात घेतलं आहे.