Latest

Esha Deol : घटस्फोटाच्या चर्चेनंतर ईशा देओलचा खास व्हिडिओ; म्हणाली, ‘कधी- कधी सोडावं लागतंय…’

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओलच्या घटस्फोटोच्या चर्चांना उधान आलं आहे. ईशाने ( Esha Deol ) २९ जून २०१२ रोजी बिझनेसमॅन भरत तख्तानीसोबत लग्न केलं आहे. दोघांना राध्या आणि मिराया या दोन गोंडस मुली आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ईशा तिच्या आई हेमा मालिनीसोबत अनेक पार्टी आणि कार्यक्रमाला उपस्थित राहिली होती. यावेळी तिच्यासोबत पती भरत तख्तानी दिसला नाही. यामुळे नेटकऱ्यांनी ईशा आणि भरत मध्ये काहीतरी बिनसले असल्याच्या चर्चा रंगली. याचदरम्यान आता ईशाने सोशल मीडियावर एक हटके व्हिडिओ शेअर केला आहे.

संबधित बातम्या 

लग्नाच्या १२ वर्षानंतर अभिनेत्री ईशा देओल पती भरत तख्तानीसोबत घटस्फोट घेत असल्याची माहित समोर आली आहे. दोघांना गेल्या काही दिवसापासून एकत्रित पार्टीत असो वा कोठेच पाहिलं गेलं नाही. याशिवाय दोघांनी सोशल मीडियावर देखील एकमेंकांना अनफोलो केलं आहे. यामुळेच दोघांचे काही तरी बिनसले असून लवकरच घटस्फोट घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, ईशा देओल आणि भरत याच्यांकडून अधिकृत्त कोणतीच माहिती मिळालेली नाही. याचदरम्यान ईशाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

ईशा देओलने ( Esha Deol ) तिच्या इंस्टाग्रामवर एका गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती आफताब शिवदासानीसोबत डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने 'कधी- कधी सोडावं लागतंय आणि फक्त तुमच्या हृदयाच्या ठोक्यावर नाचावं लागतं.', 'माझ्या पहिल्या चित्रपटाच्या आणि १८ वर्षांच्या आठवणी…' असेही म्हटलं आहे. याशिवाय ईशाने गेल्या गुरुवारी ११ जानेवारीला माझ्या पहिल्या चित्रपटाला २३ वर्षे झाली आणि तेव्हा मी एक पोस्ट करायचं राहिलं होतं. आता मी ही पोस्ट शेअर करत आहे. असेही तिने म्हटलं आहे.

ईशाने ११ जानेवारी २००२ रोजी 'कोई मेरे दिल से पूछे' या चित्रपटाद्वारे पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटाला आता २३ वर्ष पुर्ण झाले आहेत. यामुळे तिने जुना आठवणींना उजाळा देत हा व्हिडिओ शेअर केलाय. हा एक रोमँटिक थ्रिलर चित्रपट होता.

या चित्रपटाचे दिग्दर्शन विनय शुक्ला यांनी केलं आहे. या चित्रपटात आफताब शिवदासानी आणि ईशा देओल यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. ईशा- आफताबसोबत चित्रपटात जया बच्चन, अनुपम खेर, ज्युलिएट अल्बर्क, जसपाल भाटी आणि राजपाल यादव हे कलाकार आहेत. १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या तेलुगू 'पेल्ली' चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे.

SCROLL FOR NEXT