Latest

Afghanistan : तालिबानचे विद्यापीठात मुलींना प्रवेश परीक्षा देण्यास बंदी घालण्याचे आदेश

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : तालिबानने नुकतेच महिलासंदर्भात एक आदेश काढला आहे. या आदेशामुळे आता पुन्हा तालिबान (Afghanistan) चर्चेत आला आहे.  तालिबानने पुढील महिन्यात होणाऱ्या विद्यापीठ प्रवेश परीक्षेस विद्यार्थींनीना बसण्यास बंदी घालण्याचे आदेश दिले आहे. या निर्णयावर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. वाचा सविस्तर बातमी.

तालिबान उच्च शिक्षण मंत्रालयाने नुकतीच विद्यापीठांना नोटीस पाठवली आहे की, पुढील सूचना मिळेपर्यंत मुली परीक्षेसाठी अर्ज करू शकत नाहीत. त्यांनी मुलींना 1402 (सौर वर्ष) विद्यापीठ प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी करण्यास बंदी घातली आहे. या निर्णयानंतर काळजीवाहू सरकारने महिलांना अशासकीय संस्थांमध्ये काम करण्यास मनाई करणारा आणखी एक आदेशही काढला आहे. यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संताप व्यक्त केला जात आहेत. 

Afghanistan : राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर निषेध

तालिबानच्या या आदेशानंतर अनेक मानवी हक्कासाठी काम करणाऱ्य़ा संस्था तालिबानने अफगाण मुलींच्या विद्यापीठीय शिक्षणावर अनिश्चित काळासाठी बंदी घालण्याचे आदेश दिल्यानंतर, एज्युकेशन कॅनॉट वेट (ECW), मानवतावादी संस्थांनी काबुलमधील तालिबान अधिकाऱ्यांना आवाहन केले आहे की, अफगाण महिलांचे विद्यापीठ शिक्षण स्थगित करण्याचा त्यांचा निर्णय मागे घ्यावा. ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (ओआयसी) सह अनेक इस्लामिक देश आणि संघटनांनी महिला आणि मुलींच्या कामावर आणि शिक्षणावरील बंदी इस्लामिक कायद्याचे उल्लंघन म्हणून निषेध केला आहे.

SCROLL FOR NEXT