Latest

पुतण्याला सोडून पाथर्डीचे ‘काका’ काकांच्या मागे!

अमृता चौगुले

अमोल कांकरिया, पाथर्डी

पाथर्डी : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तालुक्याचे नेते अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी अजित पवारांची साथ सोडून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या विचारांशी आपण आहोत. त्यामुळे अ‍ॅड. प्रतापकाका (शरद पवार) काकांबरोबर असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बुधवारी राष्ट्रवादीचे राष्ट्रीयअध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत होणार्‍या मेळाव्यास अ‍ॅड. ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.

राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीच्या पार्शवभूमिवर अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय पूर्वीच घेतला आहे. राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर शरद पवारांची त्याच दिवशी पुण्यात अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी भेट घेत आपण तुमच्याच बरोबर असल्याची ग्वाही समक्ष भेटून दिली. तर, त्यानंतर ते बुधवारी पवारांच्या उपस्थितीत आयोजित मेळाव्यास ही हजर राहुन आपण पवारांबरोबरच असल्याचे स्पष्ट संकेत दिले. अ‍ॅड. ढाकणे आपल्या समर्थकांसमवेत पवारांची भेट घेत, आपण तुमच्या समवेत असल्याचे पुन्हा सूचित केल्याने तालुक्यातील राजकीय पारंपारिक विरोधक असलेले राजळे-ढाकणे असा संघर्ष तालुक्यात पाहायला मिळणार आहे. आज अजित पवारांच्या गटाकडे तालुक्यात राष्ट्रवादीचा कोणताही कार्यकर्त्यां सामील नसला तरी भविष्यात अजित पवारांकडे राष्ट्रवादीचा कोणता नेता जातोय याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या नेतृत्वाखाली शेवगाव पाथर्डी मतदारसंघात आपले काम सुरू आहे. पक्षांतर्गत घडामोडी झाल्या त्यामुळे पक्षाचे काम काही थांबलेले नाही. यापूर्वीही काम चालू होते, उद्याही काम चालू राहिल, शरद पवारांच्या पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन आम्ही यापुढेही काम जोमाने सुरू ठेवणार आहोत. शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील असंख्य कार्यकर्ते माझ्या समवेत मुंबईत शरद पवारांच्या सभेसाठी हजर होते, असे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. ढाकणे यांनी केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT