Latest

Aditya-L1 Mission : चांद्रयान-३ मोहिमेनंतर आता भारत ‘आदित्य-L1’ मिशनसाठी सज्ज

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : चांद्रयान-३ च्या यशस्वी प्रक्षेपण आणि चंद्राच्या दिशेने यशस्वी वाटचालीनंतर भारत आता 'आदित्य-L1' मिशनसाठी सज्ज झाला आहे, अशी माहिती भारतीय अंतराळ संशाेधन संस्‍थेने (इस्रो)  ट्विटरवरून दिली आहे. मिशन 'आदित्य एल-वन' ही सूर्याचा अभ्यास करणारी महत्त्‍वाची मोहीम (Aditya-L1 Mission) असल्याचे देखील इस्रोने स्पष्ट केले आहे.

सूर्याचा अभ्यास करणारा SDSC-SHAR हा उपग्रह बेंगळुरू येथील यू. आर. राव उपग्रह केंद्रावर तयार करण्यात आला आहे. तो भारताचे आंध्र प्रदेशातील उपग्रह प्रक्षेपण केंद्र असलेल्या सतीश धवन अंतराळ केंद्रात आणण्यात आला आहे. 'आदित्य-L1' हा उपग्रह सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पहिली अंतराळ-आधारित प्रक्षेपणासाठी भारतीय वेधशाळा सज्ज होत (Aditya-L1 Mission) आहे, असे देखील इस्रोने स्पष्ट केले आहे.

Aditya-L1 Mission: मोहिमेद्वारे सूर्याचे वर्तन, पृथ्वीच्या पर्यावरणावरील प्रभावाचा अभ्यास

'आदित्य L1' हे सूर्याचा अभ्यास करणारे पहिले अंतराळ आधारित भारतीय मिशन असेल. हे मिशन भारताच्या अंतराळ संशोधनाच्या प्रयत्नांमधील आणखी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून सूर्याचे वर्तन आणि पृथ्वीच्या पर्यावरणावरील सूर्याचा प्रभाव समजून घेण्यास हातभार लागेल अशी अपेक्षा असल्याचे इस्रोने साईटवर दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

सात पेलोड्ससह सुसज्ज मिशन

'आदित्य-L1' मिशन अंतर्गत पृथ्वीपासून अंदाजे 1.5 दशलक्ष किमी अंतरावर असलेल्या सूर्य-पृथ्वी प्रणालीच्या लॅग्रेंज पॉइंट 1 (L1) भोवती हेलो ऑर्बिटमध्ये हे अंतराळयान ठेवले जाणार आहे. हे मिशन सूर्याच्या विविध पैलूंचे निरीक्षण करण्यासाठी डिझाइन केलेल्या सात पेलोड्ससह सुसज्ज आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि पार्टिकल आणि मॅग्नेटिक फील्ड डिटेक्टर वापरून फोटोस्फियर, क्रोमोस्फियर आणि सूर्याच्या (कोरोना) सर्वात बाहेरील थरांचे निरीक्षण करण्यासाठी हे यान सात पेलोड्स घेऊन जाईल. विशेष व्हॅंटेज पॉईंट L1 वापरून, चार पेलोड सूर्याचे थेट निरीक्षण करतील आणि उर्वरित तीन पेलोड्स लॅग्रेंज पॉइंट L1 वर स्थित कण आणि फील्डचा अभ्यास करतील.

मोहिमेतून सूर्याच्या प्रसार अन् प्रभावाचा महत्त्वपूर्ण वैज्ञानिक

L1 पॉईंटच्या आजूबाजूला कोरोनल ऑर्बिटमध्ये ठेवलेल्या उपग्रहाचा सूर्याला कोणत्याही ग्रहण/ग्रहणाशिवाय सतत पाहण्याचा मोठा फायदा (Aditya-L1 Mission) या मोहिमेमुळे होणार आहे. अशाप्रकारे आंतरग्रहीय माध्यमात सौर गतिशीलतेच्या प्रसार प्रभावाचा महत्त्वपूर्ण वैज्ञानिक अभ्यास या मोहिमेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे देखील इस्रोने दिलेल्या माहितीत सांगितले आहे.

पाहा फोटो

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT