Latest

ESI Scheme : ईएसआय योजनेअंतर्गत १६.०३ लाख नव्या कर्मचाऱ्यांची भर

Shambhuraj Pachindre

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : कर्मचारी राज्य विमा योजनेत (ईएसआय) फेब्रुवारी २०२३ मध्ये १६.०३ लाख नव्या कर्मचाऱ्यांचा समावेश झाला आहे अशी माहिती कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ईएसआयसी) दिली आहे. आकडेवारीनुसार ईएसआय योजने अंतर्गत ११ हजार नव्या आस्थापनांची नोंदणी देखील झाली आहे. त्यामुळे त्यांच्या कर्मचाऱ्यांची सामाजिक सुरक्षा सुनिश्चित झाल्याची भावना केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने व्यक्त केली आहे. (ESI Scheme)

नव्या नोंदणीमध्ये २५ वर्ष वयोगटातील कर्मचाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक असून या महिन्यात नोंदणी झालेल्या एकूण कर्मचारी संख्येत त्यांची संख्या ७.४२ लाख (४६%) आहे. २०२३ मधील रोजगारसूचीचे लिंगनिहाय वर्गीकरण केल्यानंतर ३.१२ लाख महिला कर्मचाऱ्यांची भर पडल्याचे दिसून आले आहे. फेब्रुवारी महिन्यात ईएसआय योजनेत ४९ ट्रान्सजेंडर कर्मचाऱ्यांना देखील समाविष्ट करण्यात आले आहे,असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. (ESI Scheme)

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT