Latest

Adah Sharma : अदा शर्मा लालबागच्या राजाच्या चरणी, शंखनाद करत घेतलं दर्शन (Video)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : द केरल स्टोरीच्या यशानंतर अदा शर्मा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असते. अदा मराठी भाषा बोलायचा प्रयत्न करतेय. तिचे मराठी भाषा बोलतानाचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. त्यामुळे अदा शर्माची चर्चा होत राहते. आता अदाने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे.

तिने लालबागच्या चरणी शंखनाद करत दर्शन घेतले. यावेळी तिने गोल्डन ब्लाऊज, पिंक कलरची साडी, नाकात नथ, बिंदी आणि हातात गोल्डन बँगल्स असा लूक केला होता. शंखनाद करत तिने बाप्पांचे दर्शन घेतले. यावेळचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

SCROLL FOR NEXT