Latest

Ibrahim Ali Khan : ‘या’ स्टार्सचा मुलगा बॉलिवूडमध्ये पदार्पणास सज्ज, सारा म्हणाली…

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याची मुलगी सारा अली खान आणि तिचा भाऊ इब्राहिम अली खान नेहमीच चर्चेत असतात. आता सारासोबत तिचा भाऊ इब्राहिम खानही ( Ibrahim Ali Khan ) बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतची माहिती साराने एका मुलाखतीत दिली. इब्राहिम हा सैफ अली खान आणि अमृता सिंह यांचा मुलगा आहे.

सारा नुकतेच कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२३ मध्ये स्टायलिश लूकमध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमादरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत तिने इब्राहिम खान ( Ibrahim Ali Khan ) बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याचे सांगितले. सारा म्‍हणाली, 'इब्राहिमने त्याच्या पहिल्या बॉलिवूड चित्रपटाचे शूटिंग सध्या पूर्ण केले आहे. या गोष्टीवर माझा विश्वास बसलेला नाही. परंतु, हे खरे आहे. मी आणि माझ्या आई दोघीजणी इब्राहिमवर खूपच प्रेम करतो.'

गेल्या काही दिवसांपासून इब्राहिम निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. साराने २०१८ मध्ये 'केदारनाथ' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं हाेतं. आता सारा भाऊ इब्राहिम चित्रपटात येणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, सारा आगामी 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT