Latest

Sana Khan : सनाने व्यक्त केल्या प्रेंग्नसीतील अडचणी; आईला ‘हे’ करावे लागले काम

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री सना खान ( Sana Khan ) बॉलिवूड झगमटापासून दूर असून वैयक्तीक आयुष्यात रमली आहे. सनाने २०२० मध्ये इस्लाम धर्मासाठी फिल्म इंडस्ट्रीत काम करणार नसल्याचा खुलासा करून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला होता. यानंतर तिने अनस सैय्यदबरोबर लग्न बंधनात अडकली. लग्नानंतर सना सोशल मीडियावर नवनविन पोस्ट शेअर करून सक्रिय रहाते. सना आणि पती अनसचे काही फोटोदेखील सोशल मीडियावर पाहायला मिळालेत. यानंतर सनाने चाहत्यांना गुडन्यूज देत लवकरच आई होणार असल्याची माहिती दिली होती. तर आता प्रेंग्नसी काळातील कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा खुलासा केला आहे.

सना खान ( Sana Khan ) सध्या तिची प्रेंग्नसी इन्जॉय करत आहे. मात्र, या काळात तिच्यासोबत पती नसल्याची माहिती समोर आली आहे. सनाची वयस्कर आई तिची काळजी घेत आहेत. तर पती बाहेर असल्याने ती व्हिडिओ कॉल वरून त्याच्याशी संपर्कात आहे. याच दरम्यानचा एक घटना सनाने सोशल मीडियावर सांगितली आहे.

सनाने यावेळी सांगितले की, माझ्या प्रेंग्नसीचा काळ हळूहळू जवळ येत आहे. या काळात मला माझ्या मानसाची गरज आहे. परंतु, पती बाहेर असल्याचे फार काळ माझ्यासोबत राहत नाही. मात्र, वयस्कर आई माझी काळजी घेत आहे. पतीसोबत मी फोनवरून बोलत असते. मला या काळात खाली वाकता येत नाही. त्यामुळे मला बाहेर फिरता येण्यासाठी माझ्या आईने खाली वाकून बूट पायात घातली आणि बुटांची लेस बांधल्याची माहिती दिली. तर सनाने अत्यंत कठिण काळ सुरू असल्याचेही म्हटलं आहे. ही घटना सांगताना सना खूपच भावूक झाली होती.

हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावरील काही युजर्स सनाने अभिनंदन करत आहेत. तर काही नेटकरी तिच्यावर प्रश्नाचा भडिमार करत ट्रोल केले आहे. यात 'जर तुम्ही तुमच्या आईवर प्रेम करत असाल तर ही पोस्ट डिलीट करा'. 'अल्लाह अल्लाह… ती गर्भवती आहे'. 'ती स्वत: बूटांची लेस बांधू शकत नाही. त्यामुळे त्याची आई त्याला मदत करत आहे'. 'या परिस्थितीचा चुकीचा अर्थ लावल्याबद्दल लोकांना लाज वाटली पाहिजे'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT