Latest

Prajakta Mali : तुझ्यासमोर गुलाब पण फिका पडतो ❤️…

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी ( Prajakta Mali ) छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोचे सूत्रसंचालन करत आहे. शिवाली परब, प्रसाद खांडेकर, पंढरीनाथ कांबळे, विशाखा सुभेदार, ओंकार भोजणे, प्रभाकर मोरे, गौरव मोरे यांच्यासह अनेक कलाकार शोमधून चाहत्यांना खळखळून आणि पोट धरून हसवतात. याशिवाय प्राजक्ताने 'लॉकडाऊन बी पॉझिटिव्ह', 'खो खो', 'संघर्ष', 'हम्पी', 'तांदळा- एक मुखवटा' यासारख्या गाजलेल्या चित्रपटासोबत अनेक हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम, बंगाली चित्रपटात अभिनयाचा ठसा उमठवला आहे. उत्तम अभिनयासोबत प्राजक्ता नवनवीन फॅशन सेन्सनं चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. नुकतेच तिच्या लेटेस्ट फोटोंनी सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळी ( Prajakta Mali ) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर येलो- मस्टर्ड रंगाच्या घागरा-चोळीमधील काही फोटो शेअर केले आहेत. यातील तिच्या किलर लूक आणि ऑफ शोल्डर चोळीसह गळ्यातील नेकलेसने चारचाँद लावले आहेत. यातील खास म्हणजे, प्राजक्ताने खोलीच्या कोपऱ्यात भिंतीच्या आधार घेवून एकापेक्षा एक हॉट फोटोला पोझेस् दिल्या आहेत.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'न जाने क्या हुआ…जो तूने छू लिया..। खिला गुलाब की तरह……..?'. असे लिहिले आहे. केसांची स्टाईल, गळ्यात सोनेरी मोत्याचा नेकलेस, कानात छोटे इअररिग्स, हातात बांगडी, मेकअप आणि लिपस्टिकने तिचा तिचा लूक पूर्ण केला आहे. कधी तिने कमरेवर हात ठेवत तर कधी भितींवर हात ठेवत पोझ दिल्या आहेत. याशिवाय तिच्या पाठिमागे खिडकीच्या दरवाज्या दिसत आहे. हे फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरले आहेत.

'लग्न कधी करतेस?, Nice…pic…mem…..??', 'लब हीले तो मोगरके फुल खीलते हे कही अपकी अनखोन मे क्या साहिल भी मिलते हे कही ❤️❤️', 'Waah waah ❤️ ?', 'गुलाबाच्या फुला ?❤️', 'खूप सुंदर?❤️','तू स्वतः एक गुलाब आहेस ♥️? खूप गुलाबी खूप सुंदर ??', 'लाजवाब सौंदर्य आहे तुझ ?????????? तुझ्या समोर गुलाब पण फिका पडतो ❤️❤️', 'अप्सरा तू प्राजक्ताचे फुल ही तू,❤️❤️', 'पसंदीदा लोग तकलीफ बहोत देते है…❤️', 'आग काय झाले तुला लग्नं नव्हते ना करायचे ??', 'व्वा प्राजु तू गुलाबी गुलाबासारखी दिसतेस आणि माझे हृदय सुंदर गुलाबासारखे केले आहेस आणि मला तुझ्याबद्दल वेड लावले आहे प्राजू मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि गुलाबापेक्षाही खूप सुंदर आहे आणि तुझा गुलाबासारखा सुंदर चेहरा जागा झाला आहे.माझ्या हृदयात आणि आयुष्यात तुझ्यावर खूप प्रेम आहे प्रिय ??','❤️सुंदर अप्रतिम ❤️', 'Kadkkkk look aahe ??', 'Sweet?', 'Lovely⭐?', 'Beautiful luck ❤️', 'Love❤️So sweet nttu rani ?❤️', 'Love this picture is so beautiful and gorgeous'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.

तर काही नेटकऱ्यांनी प्राजक्ताला लग्न कधी करतेस?अशा प्रश्न विचारत हार्ट आणि फायरच्या ईमोजी शेअर केले आहेत. या फोटोला २ तासांत ३५ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे. याशिवाय प्राजक्ता आणखीही काही फोटो हॉट फोटो शेअर करून सोशल मीडियात सक्रिय असते.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT