Latest

Prajakta Mali : कशाची फॅशन होईल हे सांगता येत नाही : प्राजक्ताने दिले नेटकऱ्यांना उत्तर ❤️?…

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी ( Prajakta Mali)  नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. ती नवनवीन मराठमोळ्या लूकमधील मोहक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सध्या पुन्हा एकदा प्राजक्ताने खास चाहत्यांसाठी साडीतील फोटोशूट केलं आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळी ( Prajakta Mali) नुकतेच छोट्या पडद्यावरील हास्यजत्रा शोमध्ये परतली आहे. याच दरम्यान प्राजक्ताने मराठमोळ्या लूकमधील नवनवीन फोटोशूट केलं आहे. याआधी प्राजक्ताने पैठणी, बनारसी, स्टायलिश साड्यां नेसल्या आहेत. मात्र, यावेळी खास करून तिने प्युअर कॉटनच्या साडी नेसून चारचॉद लावले आहेत. यावेळी तिने फुलांनी डिझाईन केलेल्या व्हाईट रंगाच्या साडीसोबत रेड रंगाचे सिव्हलेस ब्लॉऊज परिधीन केले आहे. केसांचा पोनी, लिपस्टिक, केसांची बटा आणि मेकअपने तिच्या सौदर्यात भर घातली आहे.

या फोटोला  'साडीवर बेल्ट लावायची गरज काय..? पण कधी फॅशनची फॅशन होईल सांगता येत नाही.. ?. मग काहीही असो; तुम्हाला जे आवडते ते तुम्ही करू शकता, हसत राहा आणि पुढे जा… ♥️'. असे तिने लिहिलं आहे. यावेळी प्राजक्ताने खास करून साडीवर रेड रंगाचा बेल्ट परिधान केलाय. यानंतर मात्र, प्राजक्ताच्या लूकमधील बेल्ट पाहून नेटकऱ्यांनी साडीवर बेल्ट परिधान करण्याचा ट्रेंड आलाय? अशा प्रश्न उपस्थित केला आहे. या फोटोला पोझ देताना प्राजक्ताने कधी तिच्या कमरेवर तर कधी गुडघ्यावर हात ठेवला आहे.

प्राजक्ताचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच काही चाहत्यांनी तिच्या फोटोंचे कौतुक केलंय तर काही नेटकऱ्यांनी तिचा हा लूक अजिबात पसंतीस उतरला नाही. यात एका युजर्सने 'तू जे कॅरी करतेस ते आपोआप सुंदर होऊन जात ♥️??? काय दिसतीयेस शपथ? खूपच सुंदर ??', 'फॅशन ट्रेंड येतात जातात पण स्वॅग आणि एटीट्युड कायम राहतो??❤️', 'तू करतेस म्हणजे…ती फॅशनच ना …प्राजू..❤️❤️',' Gorgeous ?', 'कदाचित साडीला टाचण पिन लावायची गरज नको म्हणून बेल्ट लावायची फॅशन आली असेल', 'ले माळीण बाई :- साडीवर ईन करणारे आहोत आम्ही ???', 'पण हे भारी आहे ?', 'Prajakta❤️Lovely Saree with belt ??', 'खूप सुंदर ❤️❤️❤️❤️', 'Ekch number ❤️?', 'khup chan distay ❤️', 'साडीवर बेल्ट पणं छानच दिसतो, आणि त्यात तु घातला म्हणजे. खूप सुंदर दिसतेयस ? परी ?', 'you looking? ❤️', 'Cute smile..????'. यासारख्या कॉनेन्टस केल्या आहेत.

तर एका नेटकऱ्याने प्राजूला साडीवर बेल्ट लावायची गरजच काय? असा प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रश्नाचं उत्तर देताना प्राजक्ताने कधी कशाची फॅशन होईल हे सांगता येत नसल्याचे म्हटलं आहे. यासोबत काही युजर्सनी हार्ट, हास्याचा आणि फायरचा ईमोजींचा पाभस पाडला आहे. या फोटोला आतापर्यत ५० हडजारांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT