Latest

Nora Fatehi : नोराला नेटकरी म्हणतात-ही सरळ का नाही चालू शकत?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : नोरा फतेही (Nora Fatehi) डान्सिंग दिवा ते आता फॅशन दिवा झालीय. नोराचे स्टाईल स्टेटमेंट आणि सिजलिंग लुक्स तर नेहमीच चर्चेत राहतो. नोराचा प्रत्येक अंदाज फॅन्सना भूरळ घालणारा आहे. नोरा जेदेखील करते, ती गोष्ट चर्चेत येते. आता नोराचे काही सिजलिंग फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमध्ये नोरा फतेहीने सिंपल ब्लू जीन्स आणि व्हाईट टॉप घातलं आहे. फॅन्सना तिचा अंदाज आवडला असला तरी ट्रोलर्स मात्र तिच्यावर टीका करताना दिसत आहेत. (Nora Fatehi)

नोरा झाली ट्रोल

नेटकरी म्हणाताहेत की, चांगल्या गोष्टींसोबत वाईट गोष्टही येते. नोराचा लुक आणि अंदाज पाहून फॅन्स तिचे तोंड भरून कौतुक करत आहेत. तर काही ट्रेलर्स तिच्या वॉकिंग वरून चेष्टा करत आहेत. एका युजरने म्हटलं की, ही सरळ का नाही चालू शकत? आणखी एका युजरने म्हटलं की, ही वाकडं तिकडं चालते. नोरा फतेही नेहमी मुंबईमध्ये शूटिंग वा स्टुडिओमध्ये स्पॉट होते.

नोराच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचे झाल्यास तिचा मागील म्युझिक व्हिडिओ 'नाच मेरी राणी' जबरदस्त हिट झाला होता. व्हिडिओमध्ये नोराचा लुक शकीराच्या ड्रेसशी प्रेरित होता. नोराने धमाकेदार डान्स केला होता. नोरा ट्रोलदेखील झाली होती. तिला 'स्वस्त शकीरा' म्हणून ट्रोलर्सनी टीका केली. नोराची गाणी फॅन्समध्ये प्रसिध्द आहेत. आजकाल नोरा 'झलक दिखला जा' मध्ये दिसत आहे.

नोराच्या करिअरविषयी सांगायचे झाले तर तिने 'ऑरेंज मॉडल मॅनेजमेंट'मधून मॉडलिंगची सुरुवात केली. नोराला या एजन्सीने भारतात पाठवलं होतं. तिने अनेक ब्रँड्ससाठी अनेक जाहिराती केल्या. तिने २०१४ मध्ये बॉलीवूड चित्रपट 'रोर: टायगर्स ऑफ द सुंदरबन' सोबत अभिनयाची सुरुवात केली होती. तिने 'डबल बॅरल' (मल्याळम चित्रपट), 'टेम्पर', 'बाहुबली: द बिगिनिंग', 'किक २' आणि 'मिस्टर एक्स' यासारख्या चित्रपटांमध्येदेखील काम केलं. यामध्ये तिने स्पेशल अपियरेन्स दिलं होतं. २०१८ च्या सुरुवातीला तिने आपल्या अभिनयाची झलक यूट्यूब चॅनेल 'द टाईमलाईनर्स'मध्ये 'लेडीज स्पेशल: टाईप्स ऑफ सिंगल गर्ल्स' मधून दाखवून दिली होती.

(video : yogenshah_s insta वरून साभार)  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT