Latest

पुणे: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची तब्येत खालावली; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू

अमृता चौगुले

पुणे: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची तब्येत प्रचंड खालावली असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार
. त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हॉस्पिटलमध्ये विक्रम गोखले यांच्यावर गेल्या पंधरा दिवसांपासून उपचार सुरू होते. आज त्यांची प्रकृती अचानक खालावली आहे.

मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गेल्या काही दिवसांपासून ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. सध्या त्यांची प्रकृती बिघडली असून ते डॉक्टरांच्या उपचारांना प्रतिसाद देत नाहीत. त्यांची प्रकृती आता चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान त्यांच्या कुटुंबीयांकडून अद्याप याविषयी कोणतेही निवेदन किंवा माहिती देण्यात आलेली नाही.

SCROLL FOR NEXT