नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : कुख्यात गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोई याने आपल्या हिटलिस्टवर अभिनेता सलमान खान पहिल्या क्रमांकावर असल्याची कबुली राष्ट्रीय तपास संस्थेकडे ( एनआयए ) दिली आहे. ( Salman Khan and Bishnoi gang )
२०२१ मध्ये गोल्डी बराडमार्फत आपणास दोन 'जिगाना' पिस्तूल्स मिळाल्या होत्या, असेही बिष्णोई याने चौकशीत सांगितले आहे. विशेष म्हणजे जिगाना पिस्तुलद्वारेच अलिकडील काळात कुख्यात माफिया अतिक अहमद आणि त्याच्या भावाची निर्घृण हत्या झाली होती. लॉरेन्सने मागविलेल्या पिस्तुल्सद्वारे या हत्या झाल्या असल्याचा उत्तर प्रदेश पोलिसांचा संशय आहे.
लॉरेन्सने ठार मारण्यासाठी ज्या दहा लोकांची यादी बनवली होती, त्यात अभिनेता सलमान खान पहिल्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ पंजाबी गायक सिध्दू मुसेवाला याचा मॅनेंजर शगुनप्रीत, गॅंगस्टर मनदीनप धालीवाल, कौशल चौधरी, अमित डागर, बंबिहा गॅंगचा प्रमुख सुखप्रीतसिंग बुद्वा, लक्की पटियाल, गौंडर गॅंगचा सदस्य रम्मी मसाना, या गॅंगचा प्रमुख गुरप्रीत सेखों व भोले शूटर यांचा समावेश आहे.
हेही वाचा :