Latest

Pulkit Samrat-Kriti-Kharbanda Wedding : लग्नाच्या बेडित अडकले पुलकित अन्‌ कृति खरबंदा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडचे लव्हबर्ड्स कृति खरबंदा – पुलकित सम्राट यांनी सात फेरे घेतले. दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर ते विवाहबंधनात अडकले. (Pulkit Samrat-kriti-kharbanda Wedding) लग्नाचे विधि हरियाणातील मानेसर हॉटेल आयटीसी ग्रँड भारत पॅलेसमध्ये झाले. प्री-वेडिंग फंक्शनमध्ये खूप धुमाकूळ पाहायला मिळाला. आता दोघांच्याही लग्नाचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. (Pulkit Samrat-kriti-kharbanda Wedding)

कृतिने पिंक कलर लहंगा परिधान केला होता. तर पुलकित ग्रीन शेरवानीमध्ये दिसला. पुलकितच्या शेरवानीवर गायत्री मंत्र लिहिलेले दिसले. या शेरवानीचे डिझाईन खूप वेगळे दिसत होते.

पुलकित – कृतिला सोशल मीडियावर खूप शुभेच्छा मिळत आहेत. एका यूजरने कॉमेंट करत लिहिले, 'अखेर वर्षांची डेटिंग यशस्वी झाली.' दुसऱ्या युजरने लिहिलं, 'कृति – पुलकितला लग्नाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही दोघे नेहमी एकत्र राहा. दोघांनी हा चांगला निर्णय घेतला आहे.'

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुलकित सम्राट – कृति खरबंदाच्या लग्नात शानदार मेन्यू तयार आहे. दिल्लीतील प्रसिद्ध चाट आणि देशभरातील अनेक प्रसिद्ध पदार्थांचा समावेश जेवणात करण्यात आला आहे. यामध्ये कोलकाता, वाराणसी, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्राचे प्रसिद्ध मेन्यूचा समाविष्ट आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT