Latest

Kartik Aaryan : कार्तिक म्हणतो, जुन्या सवयी सुटत नाहीत

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता कार्तिक आर्यन ( Kartik Aaryan ) सध्या त्याचा आगामी चित्रपट 'भूलभुलैया – ३' च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. अलीकडेच त्यानं एक नवीन आलिशान मोटार रेंज रोव्हर एसयूव्ही खरेदी केली आहे. या मोटारीची किमंत ६ कोटी रुपये आहे; परंतु मोटार खरेदी केल्यानंतर, कार्तिक आता सायकल चालवताना दिसला.

संबंधित बातम्या 

कार्तिकने ( Kartik Aaryan ) नुकतीच एक रील शेअर केली आहे. यामध्ये तो सायकल चालवताना दिसत आहे. चाहत्यांनी त्याला ६ कोटी रुपयांची नवीन मोटार खरेदी केल्यानंतरही सायकल का चालवत आहेस, असं विचारलं. यावर कार्तिक म्हणाला की, आता मी सायकलवरून सेटवर जाण्याचा विचार करत आहे.

त्याच्या या रीलवर मत व्यक्त करत एक युजर म्हणाली की, मला तुझी ६ कोटी रुपयांची मोटार दे. यावर प्रतिक्रिया देत कार्तिक म्हणतो की, मी दुसऱ्या एका मित्राला वापरायला दिली आहे. ती परत आल्यावर सांगेन, सोन्याच्या महालात राहायला गेला तरी असं कशासाठी वागत आहेस, असं आणखी एका युजरने विचारलं. यावर कार्तिक महणाला की, जुन्या सवयी लवकर सुटत नाहीत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT