Latest

Brijesh Tripathi : भोजपुरी अभिनेते ब्रिजेश त्रिपाठी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क :  भोजपुरी ज्येष्ठ अभिनेते ब्रिजेश त्रिपाठी ( Brijesh Tripathi ) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी वयाच्या ७२ वर्षी जगाचा निरोप घेतला. त्याच्या निधनांनतर भोजपुरी इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. मुंबईतील कांदिवली येथील राहत्या घरी ब्रिजेश त्रिपाठी यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रिजेश त्रिपाठी यांच्यावर आज सोमवारी (दि. १८ डिसेंबर) रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या 

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता ब्रिजेश त्रिपाठी ( Brijesh Tripathi ) यांना दोन आठवड्यांपूर्वी डेंग्यू झाला होता. त्यामुळे त्यांना मेरठमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. रूग्णालयात त्यांची तब्येत सुधारल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला होता. यानंतर कुटुबियांना त्यांना मुंबईत आणले होते. दरम्यान काल रविवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनीही त्यांना मृत घोषित केले.

अभिनेते ब्रिजेश त्रिपाठी यांनी ४६ वर्षांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत काम केलं आहे. १९७९ मधील 'सैया तोहरे करण' या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले होतं. १९८० सालचा 'टॅक्सी चोर' हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता. भोजपुरी आणि बॉलिवूडसोबत त्यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे.

ब्रिजेश त्रिपाठी यांनी 'नो एन्ट्री', 'ओम', 'गुप्ता: द हिडन ट्रुथ', 'मोहरा', 'देवरा भैल दिवाना', 'हमार बॉडीगार्ड शिवा', 'ड्रायव्हर राजा', 'पिया चांदनी', 'राम कृष्ण बजरंगी' आणि 'जनता दरबार' यासह अनेक चित्रपटांत भारदस्त अभिनय साकारला आहे. दरम्यान त्यांनी बॉलिवूड अभिनेता अजय देवगण, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, रजनीकांत, धर्मेंद्र आणि विनोद खन्ना यांच्यासोबत काम केलं आहे. त्यांनी बॉलिवूडमध्ये २५० हून अधिक चित्रपट केले. तर मनोज तिवारी, रवी किशन, दिनेश लाल यादव, पवन सिंह आणि खेसारी लाल यादव यांच्यासह अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

अभिनेते आणि गोरखपूरचे खासदार रवी किशन यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. यात ते म्हणाले की, 'आम्ही ब्रिजेश त्रिपाठीजींसोबत जवळपास १०० चित्रपट केलं आहेत, त्यांचे जाणे म्हणजे, भोजपुरी चित्रपटसृष्टीतून एका युगाचा अंत आहे. ईश्वरचरणी त्यांच्या आत्म्यास शांती लाभो…'

SCROLL FOR NEXT