Latest

Singham Again मध्ये अक्षयची धासू एन्ट्री; अजय म्हणाला, ‘विमानामधून उतरण्यास नकार तरीही…’

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणच्या आगामी 'सिंघम अगेन' ( Singham Again ) हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात अजयसोबत रणवीर सिंह, अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अक्षय कुमार यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. यामुळे पुन्हा एकदा अजय देवगणला पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान चित्रपटातील 'सूर्यवंशी' म्हणजे, अक्षय कुमारची विमानातून खाली उतरताना पहिला लूक व्हायरल झाला आहे. यानंतर चाहत्यासह अनेकांनी अक्षयची धासू एन्ट्री असल्याचे बोलले आहे. तर दुसरीकडे अभिनेता अजयने यावर हटके कॉमेन्टस केली आहे.

संबंधित बातम्या 

अभिनेता अजय देवगणने नुकतेच एक्स (x) ट्विटरवर अक्षय कुमारचा आगामी 'सिंघम अगेन' ( Singham Again ) चित्रपटातील पहिला लूक शेअर केला आहे. या लूकमध्ये अक्षय कुमार 'सूर्यवंशी' च्या भूमिकेत असून तो एका विमानातून खाली उतरताना दिसतोय. ब्लॅक रंगाच्या टिशर्ट आणि डेमिममध्ये दोन्ही हातात बंदूक घेवून अक्षय खाली जमिनीकडे पाहाताना दिसतोय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये अजयने लिहिले आहे की, 'विमानामधून उतरण्यास माझा नकार होता, तरीही अक्षय कुमार म्हणजे, माझा मित्र सुर्यवंशीची विमानातून खाली उतरतानाच एन्ट्री केली.'

या पोस्टला रिट्विट करत अक्षय कुमारने हा फोटो शेअर केला आहे. यात त्याने लिहिले आहे की, 'आलिया रे आलिया… सूर्यवंशी आलिया'. एटीसी प्रमुख वीर सूर्यवंशी यांच्या रिलीजची वेळ जवळ आली आहे. मग तुम्ही तयार आहात का? असे लिहिले आहे.

अक्षय कुमार आणि अजय देवगणचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांसह बॉलिवूड कलाकारांनी कॉमेन्टचा पाऊस पाडला. दरम्यान काही लोकांनी नेहमीप्रमाणे अक्षयची धासू एन्ट्री असल्याचे म्हटलं आहे. तर काहींनी या फोटोचे भऱभरून कौतुक केलं आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपट पुढील वर्षी १५ ऑगस्ट २०२४ रोजी रिलीज होणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT