Latest

Aashram 3 : सोनियाच्या जाळ्यात फसला बाबा निराला; बॉबी देओल-ईशा गुप्ताची रंगणार केमेस्ट्री

अमृता चौगुले

मुंबई; पुढारी ऑनलाईन : एमएक्स प्लेयर वरील वेब सीरिज 'आश्रम 3' (Aashram 3) चा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे. आश्रम 3 च्या प्रत्येक ट्रेलरसोबत चाहत्यांमधील उत्सुकता झपाट्याने वाढत आहे. पण या नव्या ट्रेलरमध्ये सोनियाच्या आश्रमातील प्रवेशाची झलक पाहायला मिळाली आहे. एवढेच नाही तर बाबा निराला पूर्णपणे सोनियाच्या जाळ्यात अडकल्याचे स्पष्ट झाले असून आश्रमातील सर्वजण बाबाच्या या वृत्तीवर नाराज आहेत. त्यामुळे बाबा निराला बनलेला बॉबी देओल (Bobby Deol) आणि सोनियाच्या भूमिकेत दिसणारी ईशा गुप्ता (Esha Gupta) यांची रंजक केमिस्ट्री या नव्या सिझनमध्ये पहायला मिळणार आहे.

आश्रम 3 (Aashram 3) चा हा प्रोमो शेअर करताना अभिनेत्री ईशा गुप्ताने लिहिले की, 'कोण आहे ही सोनिया जिने बाबाला तिच्याकडे पूर्णपणे आकर्षित केले ? जाणून घ्या एक बदनाम… आश्रम ३ मध्ये. नव्या सिझनमध्ये ईशा गुप्ताची एन्ट्री झाल्यामुळे व्यक्तिरेखा बद्दल सर्वाची उत्सुकता वाढली आहे. शिवाय ट्रेलरमधील तिचा अंदाज पहाता तिच्या अभिनयाची चर्चा आता पासूनच सुरु झाली आहे. पण ती या आश्रमात एका उद्देशाने आली आहे आणि त्यामागे एक मोठी कथा आहे, हे या ट्रेलरवरून स्पष्ट झाले आहे. अशाप्रकारे आश्रममध्ये बरीच अलथापालथ होणार असे दिसते आहे. एमएक्स प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आश्रमचा तिसऱ्या भागाचे ३ जून रोजी स्ट्रीमिंग केले जाणार आहे.

प्रकाश झा (Prakash Jha) निर्मित आणि दिग्दर्शित, आश्रम 3 (Aashram 3) मध्ये पुन्हा एकदा बॉबी देओल, आदिती पोहनकर (Aditi Pohankar) , चंदन रॉय सन्याल, दर्शन कुमार, अनुप्रिया गोएंका, ईशा गुप्ता, सचिन श्रॉफ, अध्यायन सुमन, त्रिधा चौधरी आणि अनुरीता के झा दिसणार आहेत. तसे या नव्या भागात अभिनेत्री ईशा गुप्ता देखिल असणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT