Latest

Aamir Khan : आमिरला आली एक्स वाईफची आठवण; किरण रावसोबत कापला बर्थडे केक

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आज ५९ वर्षाचा झाला. १४ मार्च, १९६५ रोजी मुंबईमध्ये आमिरचा जन्म झाला होता. (Aamir Khan ) आमिर खानने आपल्या करिअरमध्ये राजा हिंदुस्तानी, थ्री इडियट्स, पीके आणि दंगल सारखे अनेक हिट चित्रपट दिले. त्याचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. साठी गाठत असतानाही विविध वयातील भूमिका साकारणे, हा त्याचा हातखंडाच म्हणावा लागेल. (Aamir Khan )

बॉलीवूडचा सुपरस्टार आमिर खानला वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा दिल्या जात आहे. फॅन्सदेखील सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने आमिर खानने सांताक्रूज येथे आपल्या ऑफिसच्या बाहेर येऊन मीडिया समोर केक कापला. दरम्यान, आमिर खानसोबत त्याची एक्स वाईफ किरण राव आणि तिच्या प्रोडक्शनमध्ये तयार झालेला चित्रपट 'लापता लेडीज'ची स्टार कास्टदेखील दिसली.

यावेळी आमिरने ब्लॅक टी-शर्ट सोबत ब्लू डेनिम परिधान केला होता. आमिर खानची एक्स वाईफ किरण रावदेखील स्टायलिश दिसत होती. किरणने मल्टीकलर ड्रेस परिधान केला होता. यादरम्यान, 'लापता लेडीज'ची स्टार कास्ट नितांशी गोयल, प्रतिभा रांटा आणि स्पर्श श्रीवास्तवदेखील खूप स्टायलिश अंदाजात दिसली.

केक कापल्यानंतर आमिर खानच्या एक्स वाईफने त्याला आपल्या हातांनी केक भरवला आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आमिरने वाढदिवसाच्या निमित्ताने सांगितले की, "जर तुम्हाला मला काहीतरी गिफ्ट द्यायचे असेल तर 'लापता लेडीज' चित्रपटाचे तिकिट खरेदी करून पाहा, तेचं माझे गिफ्ट असेल."

आमिर खानच्या केक कटिंगचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, फॅन्सनी त्यांना खूप शुभेच्छा दिल्या आहेत.

video – Viral Bhayani Instagram वरून साभार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT