Latest

Aamir Khan-Kiara Advani ADVT : आमीर खान-कियारा अडवाणीची ‘ती’ वादग्रस्त जाहिरात मागे

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Aamir Khan-Kiara Advani ADVT : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याचं कारण आहे एक जाहिरात. या जाहिरातीत आमिर अभिनेत्री कियारा आडवाणीसोबत दिसत आहे. मात्र ही जाहिरात पाहून नेटकरी कियारा आणि आमिर दोघांनाही ट्रोल करत आहेत. ही जाहिरात हिंदू विरोधी असल्याची टीका होत आहे. या जाहिरातीमुळे सामाजिक भावना दुखावल्याचाही आरोप करण्यात येत आहे. नेटकऱ्यांसोबतच 'द काश्मिर फाइल्स' चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही आमिर आणि कियारावर निशाणा साधत त्यांना मूर्ख म्हटले आहे. अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे. ही जाहिरात मागे घेतल्याचे वृत्त समोर येत आहे.

काय होती जाहिरात… (Aamir Khan-Kiara Advani ADVT)

आमिर आणि कियारा यांच्या जाहिरातीत ते दोघेही नववधू आणि वराच्या वेशात दिसत आहेत. परंतु, कियाराऐवजी आमिरची पाठवणी होत आहे. आणि आमिर माप ओलांडून कियाराच्या घरी राहण्यासाठी येत आहे. या जाहिरातीमध्ये वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरांना छेद देत नवं काहीतरी करण्याचा संदेश देण्यात आलेला आहे. मात्र नेटकऱ्यांना ही जाहिरात मुळीच पटली नसल्याचं चित्र आहे. त्यांच्या या जाहिरातीला सोशल मीडियावर जोरदार विरोध होताना दिसतोय. एका नेटकऱ्याने जाहिरातीला विरोध करत म्हंटल, 'आमिर खान नेहमीच हिंदू परंपरांची थट्टा उडवताना दिसतो. ही बँकेची जाहिरात फक्त हिंदूंसाठीच का आहे? ही बँक इतर धर्मियांना त्यांच्या परंपरा बदलण्याचा संदेश देईल?'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT