Latest

अजानच्या वेळी हनुमान चालीसा लावल्याने तरुणाला बेदम मारहाण, बंगळुरुमधील घटना

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : बंगळुरुमधून एका दुकानदाराला मारहाण झाल्याचे प्रकरण सध्या समोर आले आहे. एका टोळक्याने अजानच्या वेळी हनुमान चालीसा लावल्यामुळे दुकानदाराला बेदम मारहाण केली.  हे भक्ती गीत बंद करण्यासाठी काही लोक आले व त्यांनी मारहाण करायला सुरुवात केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या जखमी दुकानदाराला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा नोंद केला आहे. बंगळुरुच्या नगरथपेटेमध्ये ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बंगळुरुच्या नागरथपेठ परिसरात घडली. स्थानिक दुकानदारांनी बराच विरोध केल्यानंतर बंगळुरुच्या हलासुरू गेट पीएस पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवली. पोलिसांनी सुलेमान, शाहनवाज, रोहित, दानिश आणि तरुण विरोधात गुन्हा नोंद केला आहे. पीडित व्यक्तीच मुकेश नगरथपेटेमध्ये मोबाइलचे दुकान आहे. त्याच्या शेजारीच प्रार्थना केंद्र आहे.  संध्याकाळी 6.30 च्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती तक्रारीत दिली आहे. यावेळी दुकानातील भक्ती गीत बंद करायला सांगितले आणि त्यावरुन हा वाद सुरु झाला. यावेळी वाद सुरु असताना टोळक्याने दुकानदाराला मारहाण केली. यामध्ये दुकानदार तरुण जखमी झाला.

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना पीडित तरुण म्हणाला, 'मी संध्याकाळी 6 वाजता दुकानातील स्पीकरवर हनुमान चालीसा लावली होती. यावेळी काही जणांनी मला हनुमान चालीसा बंद करण्यास सांगितले. मी त्यांना नकार दिल्यावर त्यांनी वाद घातला आणि मला मारहाण सुरू केली.' हल्ला करणाऱ्या टोळक्यापैकी 2 ते 3 जणांना तो ओळखतो.

'खुलेआम हिंदुंना धमकावल जातय'

या घटनेवर कर्नाटकमधील भाजपाने 'X' वर पोस्ट लिहून प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये लिहिले आहे की, "कर्नाटकला काँग्रेसच्या तुष्टिकरणाच्या राजकारणाची किंमत चुकवावी लागतेय. कट्टरपंथी अतिवादी तत्वांनी रस्त्यावर कब्जा केलाय. खुलेआम हिंदुंना धमकावल जातय. जेव्हापासून काँग्रेस सत्तेत आलीय, तेव्हापासून कर्नाटकमध्ये धर्मतंत्र हावी झालय"

SCROLL FOR NEXT