Latest

असा होता ब्रिटिशकालीन भारतीय पासपोर्ट

दिनेश चोरगे

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : सोशल मीडियावर जुन्या वस्तूही व्हायरल होताना दिसतात. यामुळे आपणास इतिहासाची माहिती मिळण्यास मदत होते. आता 1928 मधील ब्रिटिशकालीन भारतीय पासपोर्टचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून भारतात त्यावेळी जारी करण्यात आलेल्या पासपोर्टच्या कागदाची गुणवत्ता आणि त्याकाळातील लिखाणावरून आता चर्चा रंगली आहे.

पासपोर्टमध्ये दिसणार्‍या व्यक्तीने 1928 आणि 1930 रोजी प्रामुख्याने इराक आणि इराणचा दौरा केला असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. पासपोर्ट सय्यद मोहम्मद खलील रहमान शाह नावाच्या व्यक्तीचा असून तो त्यावेळी ब्रिटिश सरकारमध्ये क्लार्कची नोकरी करत होता. व्हिडीओ 70 हजार लोकांनी लाईक केला आहे. यावर प्रतिक्रिया दिल्या जात असून कागदाची गुणवत्ता खूपच चांगली वाटत असल्याची एकाने तर त्यावेळी इराण आणि इराक लोकप्रिय ठिकाणे असावीत, अशी दुसर्‍या एकाने प्रतिक्रिया दिली आहे. त्याकाळातील लिखाण किती चांगले होते, अशी कमेंट आणखी एकाने केली आहे.

SCROLL FOR NEXT