Latest

Unique Shiva Temple : समुद्राच्या पाण्याने वेढले जाणारे अनोखे शिव मंदिर

Arun Patil

गांधीनगर : आपल्या देशात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत असंख्य शिव मंदिरे पाहायला मिळतात. मात्र, काही मंदिरांचे एक खास वैशिष्ट्यही असते. असेच एक अनोखे शिव मंदिर गुजरातमध्ये आहे. 'स्तंभेश्वर महादेव मंदिर' या नावाने ओळखले जाणारे हे मंदिर दिवसातून दोन वेळा समुद्राच्या पाण्याने वेढले जाते. रोज सकाळी व सायंकाळी हे मंदिर जणू काही समुद्रात गायबच होत असते! अर्थात यामागे नैसर्गिक घटनेचे कारण आहे.

हे स्तंभेश्वर महादेव मंदिर सुमारे दीडशे वर्षे जुने आहे. ते अरबी समुद्र आणि खंभातच्या खाडीने वेढलेले आहे. समुद्राला भरती आली की हे मंदिर पाण्यात जाते. असे दिवसातून दोन वेळा घडते. ओहोटीच्या वेळी मंदिर पुन्हा दिसू लागते. समुद्र जणू दिवसातून दोन वेळा मंदिरातील शिवलिंगावर जलाभिषेकच करीत असतो! श्रावण महिन्यात या मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक येत असतात. महाशिवरात्रीलाही इथे मोठी गर्दी असते. स्थानिक लोक या मंदिराचा संबंध शिवपुत्र कार्तिकेयाशीही जोडतात. हे मंदिर गांधीनगरपासून सुमारे 175 कि.मी.वरील जंबूसरच्या कवी कंबोई गावात आहे.

SCROLL FOR NEXT