Latest

बुडालेल्या जहाजातील सोने, रत्नांचा खजिना

अविनाश सुतार

लंडन ः तब्बल 366 वर्षांपूर्वीच्या एका स्पॅनिश जहाजाच्या अवशेषांमधून अलीकडेच मोठा खजिना शोधण्यात आला आहे. त्यामध्ये सोन्याची नाणी, विविध रत्ने, दागिने आदींचा समावेश आहे. बहामासच्या किनार्‍यापासून 70 किलोमीटरवर अटलांटिक महासागरात हे जहाज बुडाले होते. त्यामधील वस्तू सुरक्षितपणे बाहेर काढून त्या म्युझियममध्ये ठेवल्या जाणार आहेत.

या जहाजाचे नाव 'अद्भूत नारी' अशा अर्थाचे स्पॅनिश भाषेतील आहे. हे जहाज 891 टन वजनाचे होते व ते स्पेन व कोलंबियादरम्यान सन 1656 मध्ये प्रवास करीत होते. मात्र, वाहतुकीवेळी काही गफलत झाल्याने दुसर्‍या एका जहाजाशी धडक होऊन हे जहाज पाण्यात बुडाले. या अपघातात 600 ते 650 लोकांचा मृत्यू झाला व जहाज पाण्यातील प्रवाळ रचनांमध्ये जाऊन विसावले. त्याचे अवशेष समुद्रतळाशी तेरा किलोमीटरच्या भागात विखुरलेले आहेत.

त्यामधील मौल्यवान वस्तू चोरांच्या हाती लागू नयेत यासाठी खास मोहीम काढून या वस्तू गोळा केल्या जात आहेत. त्यामध्ये पाचूसारखी रत्ने, सोन्याचे हार, पेंडंटस्, कलाकुसरीच्या वस्तू, सोन्याची नाणी आदींचा समावेश आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT