Latest

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पट्टेरी वाघ

दिनेश चोरगे

कराड; पुढारी वृत्तसेवा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात गस्त घालणार्‍या वन विभागाच्या कर्मचार्‍यांना काही दिवसांपूर्वी वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले होते. त्यामुळे या परिसरात वन विभागाने लावलेल्या कॅमेर्‍यांची त्यांनी तपासणी केली. त्यावेळी एका कॅमेरात 17 डिसेंबर रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पट्टेरी वाघ कैद झाला आहे.

वन विभागास सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जंगल भागात मंगळवार, दि. 12 रोजी वाघाच्या पायाचे ठसे आढळले होते. ही माहिती फिरती करणार्‍या वनरक्षक व वनमजूर यांंनी वनक्षेत्रपाल यांना कळवली होती. त्यानंतर पुढील तीन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी वाघाच्या
पायांचे ठसे व विष्टा सापडली होती. या पार्श्वभूमीवर जंगल परिसरातील वनविभागाने लावलेले कॅमेरा तपासले. त्यावेळी रविवार, 17 डिसेंबर रोजी पहाटे 4.59 वाजता वाघाचा या परिसरातील वावर कैद झाला असल्याचे निदर्शनास आले आहे. पट्टेरी वाघ आढळणे ही बाब सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा अत्यंत आशादायी आहे. त्यामुळे सर्व व्याघ्र प्रकल्पातील अधिकार्‍यांना सतर्क करण्यात आल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.

SCROLL FOR NEXT