Latest

भारत-पाकिस्तान सीमेवर उभारणार शिवरायांचा पुतळा

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शत्रूंशी लढणार्‍या जवानांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि नैतिक मूल्ये त्यांच्या पुतळ्याकडे पाहून दररोज मिळावीत, महाराजांचे शौर्य स्मरून शत्रूंसोबत लढण्याचे बळ मिळावे, यासाठी 'आम्ही पुणेकर' संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा थेट भारत-पाकिस्तानच्या सीमेवर उभारण्यात येणार आहे.

काश्मीरच्या किरण व तगधर-टिटवाल खोर्‍यात दोन ठिकाणी नियंत्रण रेषेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिकृती स्थापन करण्यात येणार आहे. काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सागर दत्तात्रय डोईफोडे यांच्या पुढाकाराने मूर्ती साकारण्यात येणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज अटकेपार स्मारक समितीचे प्रमुख अभयराज शिरोळे व 'आम्ही पुणेकर'

संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी या उपक्रमाचे नियोजन केले आहे. मार्च 2023 महिन्याच्या अखेरीस पुतळा बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. 'आम्ही पुणेकर' संस्थेतर्फे महाराष्ट्रातील शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड, तोरणा, शिवनेरी, राजगड, प्रतापगड या किल्ल्यांवरील माती व पाणी भूमिपूजनासाठी नेण्यात येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT