Latest

पिंपरी : शिवभक्तांच्या टेम्पोला भरधाव ट्रकची धडक; २५ जण जखमी

अमृता चौगुले

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : भरधाव वेगातील ट्रकने शिवज्योत घेऊन जाणाऱ्या टेम्पोला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात २० ते २५ शिवभक्त जखमी झाले आहेत. मुंबई- बंगळुरु महार्गावर पहाटे पावणे चारच्या सुमारास ताथवडे येथे हा अपघात झाला. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास शिवभक्त मल्हार गड येथून शिवज्योत घेऊन कार्ला येथील शिळाटना येथे जात होते. दरम्यान, पहाटे पावणे चारच्या सुमारास ताथवडे येथे भरधाव वेगात आलेल्या ट्रकने त्यांच्या टेम्पोला पाठीमागून धडक दिली. यामध्ये टेम्पोतील शिवभक्त जखमी झाले असून त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. टेम्पोमध्ये एकूण ३५ जण होते. यातील २० ते २५ जणांना किरकोळ तसेच गंभीर दुखापत झाली आहे.

SCROLL FOR NEXT