Latest

GST collection : एप्रिल महिन्यात १.८७ लाख कोटी रुपयांची विक्रमी जीएसटी करवसुली

backup backup

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सरत्या एप्रिल महिन्यात 1.87 लाख कोटी रुपयांची विक्रमी जीएसटी करवसुली झाली असल्याची माहिती केंद्र सरकारकडून सोमवारी देण्यात आली. विशेष म्हणजे सलग चौदाव्या महिन्यात करवसुली 1.40 लाख कोटी रुपयांच्या पुढे राहिलेली आहे.

याआधी एप्रिल 2022 मध्ये सर्वाधिक 1.68 लाख कोटी रुपयांची जीएसटी करवसुली झाली होती. करवसुलीचा तो विक्रम सरत्या एप्रिलमध्ये मोडला गेला आहे. एप्रिलमध्ये केंद्रीय जीएसटीच्या माध्यमातून सरकारला 38 हजार 440 कोटी रुपयांचा, राज्य जीएसटीच्या माध्यमातून 47 हजार 412 कोटी रुपयांचा तर इंटिग्रेटेड जीएसटीच्या माध्यमातून 89 हजार 158 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. याशिवाय 12 हजार 25 कोटी रुपये उपकरांच्या माध्यमातून प्राप्त झाले. चालू आर्थिक वर्षात जीएसटी करवसुलीमध्ये 12 टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज सरकारने गत फेब्रुवारी महिन्यात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात व्यक्त केला होता.

SCROLL FOR NEXT