Latest

चासकमान धरण परिसरात दिसला दुर्मिळ शॅमेलियन सरडा

अमृता चौगुले

कङूस : पुढारी वृत्तसेवा : चासकमान धरण परिसरातील घनदाट जंगलातून जाणाऱ्या रस्त्यावर रंग बदलणारा दुर्मिळ शॅमेलियन सरडा आढळून आला. या परिसरात दिवसेंदिवस शॅमेलियन सरड्याच्या संख्येत वाढ झाली आहे. चासकमान धरण परिसरातून जाणाऱ्या रस्त्यावर कङूस, वेताळे येथील पर्यावरण निसर्ग मित्र अँड. सुजय जाधव, विशाल भोर, अक्षय बोंबले, प्रमोद काळोखे, मंगेश धंद्रे, गणेश वाळुंज यांना रस्त्यावर फिरताना आढळला.

परिसरात घनदाट झाडी असल्याने परिसरात अनेक जातीचे सरडे असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान आकर्षक असलेल्या या शॅमेलियन सरड्याला बघण्यासाठी रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी गर्दी केली. तो वेळेनुसार संकटसमयी आपला रंग बदलत असतो. यामुळे सरड्याला रंग बदलणारा गिरगिट म्हणून देखील ओळखल्या जाते. त्वचेखाली असलेल्या रंगद्रव्यामुळे रंग बदलण्यात माहीर असणारा सरडा आहे. वातावरणातील अनुकूलतेनुसार हा सरडा आपला रंग बदलत असून हिरव्या रंगाचा हा शॅमेलियन सरडा क्वचितच आढळून येतो.

या सरड्याला लाभलेली निसर्गदत्त देणगी म्हणजे झाडे, पाने आणि गवताच्या रंगानुरुप तो रंग बदलू शकतो. झाडावर चढताना झाडाचे खोड ज्या रंगाचे असेल तसा रंग बदलतो कधी हिरवा, पिवळा, काळसर असे रंग बदलत राहतो. त्याचे कारण म्हणजे नैसर्गिक रंगात मिसळून गेल्याने शत्रूपासून संरक्षण करता येते.

हा शॅमेलियन शक्यतो झाडावर राहतो, तर कधी-कधी तो आपल्या भक्ष्याच्या शोधार्थ रस्त्यांवर आढळून येतो. झाडावर चढताना झाडाचे खोड ज्या रंगाचे असेल तसा रंग बदलतो कधी हिरवा, पिवळा, काळसर असे रंग बदलत राहतो. त्यामुळे त्याचे संरक्षण होते. या सरड्याची शेपटी लांब असते, त्यामुळे तो झाडाच्या फांदीला शेवटी गुंडाळून झोकेसुद्धा घेतो. हा सरडा अनेकांनी उत्सुकतेने बघितला. चासकमान धरणाचा परिसर विविधतेने नटलेला असून परिसरात नानाविध प्रजातीचे साप, पशु-पक्षी, विविध फुलपाखरे, सरपटणारे प्राण्यांचे वास्तव्य असल्याचे यावरून समजते. तसेच परिसरातील डोंगरावर वनौषधीसुद्धा आढळत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT